झी मराठी चॅनेलवरील ‘तुला पाहते रे’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली आणि पहिल्याच मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे गायत्री दातार. गायत्रीने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिचे जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. ती सुद्धा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. याच माध्यमातून गायत्री तिचे फोटो, व्हिडिओ आणि स्वतः बद्दल ती नेहमी अपडेट देत असते.
सध्या गायत्री तिचे अनेक फोटो पोस्ट करत आहे. यात ती कधी बोल्ड आणि वेस्टर्न लुकमध्ये आहे, तर कधी ट्रॅडिशनल लूकमध्ये. मात्र, या सर्वांमध्ये गायत्रीच्या काही फोटोंनी खूप लक्ष वेधून घेतले आहे. निळया रंगाच्या साडीतील हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. या फोटोंमुळे गायत्री ट्रोल देखील होत आहे. अतिशय भडक मेकअप केलेल्या गायत्रीने काळ्या रंगाची लिपस्टिक लावल्याने तिचा हा लुक ट्रोलिंग बाजाच्या निशाण्यावर आला आहे.
वरील फोटोंमध्ये गायत्रीच्या चेहऱ्यावरील भाव खूप विचित्र आहेत. हे फोटो पोस्ट करताना तिने लिहिले की, ‘बिर्याणी खाताना अचानक वेलची चावली जाते, तेव्हा माझा चेहरा.’
गायत्रीच्या या फोटोंना काही फॅन्स ट्रोल करत आहेत, तर काहींनी तिला पाठिंबा देखील दिला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फॅन्सचे दोन ग्रुप तयार झाले आहे. काही फॅन्सने तर तिच्या या फोटोना खूपच मजेदार कमेंट्सने रिप्लाय दिले आहेत.
एकाने तिला ‘कोळसा खाऊ नको’, असे सांगितले. दुसरा फॅन म्हणाला की ‘मशेरी लावू नको ताई.’ एकाने तर ‘असले चाळे करू नको’ असा सल्ला दिला आहे. ट्रोल करणाऱ्या फॅन्सना गायत्रीने आपल्या अंदाजात प्रत्युत्तरही दिले आहे. याव्यतिरिक्त गायत्रीच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांनी भरभरून लाईक्स दिले आहे.
हेही वाचा-
मराठीतील आघाडीची अभिनेत्री आणि लावणीसम्राज्ञी आज आहे अंथरुणाला खिळून
मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावेकडून ‘रॉयल’ लग्नाचा व्हिडिओ पोस्ट, सोशल मीडियावर जोरदार व्हायरल
गोड बातमी! ‘वाहिनीसाहेब’ झाल्या ‘आईसाहेब’, अभिनेत्री धनश्री काडगावकरला पुत्ररत्न प्राप्ती