‘भागे रे मन कही…!’ व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं गायत्री दातारचं मनमोहन सौंदर्य


सध्याच्या काळात सर्वचजण सोशल मीडियावर वेळ घालणे पसंत करतात. त्याप्रमाणे, ‘तुला पाहते रे’ फेम गायत्रीही सोशल मीडियावर सक्रिय राहून, चाहत्यांचे मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही. फोटो असो वा व्हिडिओ, ती सतत काही ना काही पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहते. चाहतेही तिच्या पोस्ट्सला भरभरून प्रेम देत असतात. यामुळेच तिचे फोटो आणि व्हिडिओ दरदिवशी इंटरनेटवर मोठ्या व्हायरल होतात.

गायत्रीचा नुकताच एक मनमोहक असा व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून तुम्ही देखील तिच्या प्रेमात पडल्या शिवाय राहणार नाहीत. गायत्री इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते. हा व्हिडिओ तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. यात तिने साडी परिधान केली आहे, ज्यात ती अतिशय सुंदर दिसत आहे. शिवाय केसात माळलेली गुलाबाची फुलं चाहत्यांचे हृदय चोरत आहेत.

तुम्ही पाहू शकता की, यात कशाप्रकारे अभिनेत्री तिच्या अदा दाखवत आहे. यातील तिच्या अदा पाहून चाहते अक्षरशः भुरळून गेले आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय, “भागे रे मन कही, आगे रे मन कही..!” या व्हिडिओला नेहमी प्रमाणे चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.

‘तुला पाहते रे’ मधून टीव्हीवर पदार्पण करून, तिने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली. आपल्या सोज्वळ आणि निरागस अभिनयाच्या जोरावर तिने अमाप लोकप्रियता मिळवली. अभिनयाने सर्वांना भुरळ पाडणाऱ्या गायत्रीने, आपल्या कॉमिक टायमिंगने देखील सर्वांना प्रभावित केले आहे. ‘तुला पाहते रे’ मालिका संपल्यानंतर तिने ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी शोमध्ये काम करून, प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडले.


Leave A Reply

Your email address will not be published.