Thursday, February 6, 2025
Home अन्य अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने सांगितला दीपिका सोबतच्या किसिंग सीनचा भन्नाट किस्सा, म्हणाला…

अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने सांगितला दीपिका सोबतच्या किसिंग सीनचा भन्नाट किस्सा, म्हणाला…

सध्या चित्रपट क्षेत्रात सर्वत्र दीपिका पदुकोणच्या ‘गेहराइयां’ चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे. चित्रपट प्रदर्शित झाला असून चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या शूटिंग वेळीचा एक मजेशीर किस्सा चित्रपटातील सिद्धांत चतुर्वेदीने सांगितला आहे.

दिग्दर्शक शकुन बात्रा यांचा ‘गेहराइयां’ चित्रपट सध्या सगळीकडे चर्चेत आहे. चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या बोल्ड सीनची तर जास्त चर्चा होताना दिसत आहे. नुकतीच ‘गेहराइयां’ चित्रपटाची संपूर्ण टीम चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या कार्यक्रमात गेली होती. यावेळी सगळ्यांनीच धमाल केलेली पाहायला मिळाली. त्यांच्या या कार्यक्रमात प्रदर्शित न झालेले सीन कपिल शर्माच्या यूट्यूब चॅनेलवर दाखविण्यात आले आहेत. ज्यामध्ये सिद्धांत चतुर्वेदीने दीपिकासोबतच्या या इंटिमेट सीनबद्दल खुलासा केला आहे.

या व्हिडिओची सुरुवात एका चायनीज गेमच्या जाहिरातीने झालेली पाहायला मिळते. त्यामध्ये सगळे कलाकार कानात हेडफोन्स लावून मोठ्या आवाजात गाणी ऐकत आहेत त्याचवेळी कपिल शर्माचे बोलणे सुद्धा ऐकत आहेत. त्यापुढे अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी एक मजेदार किस्सा सांगताना दिसतो.

तो म्हणतो की, “ज्यावेळी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला तेव्हा गावाकडून काकांचा कॉल आला होता. ते म्हणाले की किसिंग सीन केला आहेस, खरोखर स्पर्श झाला की मध्ये आरसा लावला होता. सिद्धांत चतुर्वेदीच्या या मजेशीर खुलाशाने कपिल शर्मा त्याची फिरकी घेताना दिसत आहे. यावेळी “काकांचे वय किती आहे? ” असे विचारले असता 50 च्या आसपास असेल असे उत्तर अभिनेता सिद्धांत देतो यावर “निवांत कानपूरमध्ये फिरायचे ते नको त्या गोष्टीत कशाला लक्ष घालताय,” असे कपिल शर्माने म्हटले आहे. कपिल शर्माच्या या वाक्याने सगळेच हसताना दिसत आहेत.

हेही वाचा :

author avatar
Chinmay Remane

हे देखील वाचा