Thursday, July 18, 2024

चाहत्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम! समोर आली दीपिका अन् सिद्धांतच्या ‘गहराइयां’ची रिलीझ डेट

दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) अभिनित ‘गहराइयां’ या चित्रपटाची प्रेक्षकांची प्रतीक्षा जवळपास संपली आहे. कारण दीपिका पदुकोणने या चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांसमोर कधी येणार आहे, याची अधिकृत घोषणा केली आहे.

दीपिका पदुकोणने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक ऑडिओ क्लिप जारी केली आहे. ज्यामध्ये आयुष्याच्या गहराईबद्दल (खोलाबद्दल) बोलताना दीपिका चाहत्यांना एक संदेश देते. अभिनेत्री म्हणते, “जेव्हा आपण जगाच्या या खोलात डुंबू तेव्हा भावना आणखीनच वाढतील.” ही क्लिप रिलीझ करताना अभिनेत्रीने सांगितले की, या चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणजेच २० जानेवारीला रिलीझ होणार आहे.

अनन्या आणि सिद्धांतनेही केल्या दीपिकासारख्या पोस्ट शेअर
दीपिकाशिवाय अनन्या पांडे (Ananya Panday) आणि सिद्धांत चतुर्वेदी यांनीही आपापल्या परीने मनाच्या ‘गहराइयां’बद्दल आपापले म्हणणे मांडले आहे. सिद्धांत चतुर्वेदीने दीपिकाप्रमाणेच एक ऑडिओ क्लिप जारी केली. तो म्हणाला, “आपण निवडलेल्या गोष्टींचे परिणाम होतात, जर तुम्ही या जगात डुबकी मारली तर तुम्हाला त्याची खोली जाणवेल.” तर अनन्या पांडे म्हणाली, “जसजसे आपण खोल जगात झेप घेतो, तसतसे प्रेम गुंतागुंतीचे होईल.”

काही काळापूर्वी ‘गहराइयां’चे ६ पोस्टर्स एकाच वेळी रिलीझ करण्यात आले होते. पोस्टरमध्ये दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी यांची जवळीक दिसून आली. त्याचवेळी दुसऱ्या एका पोस्टमध्ये दोघांचे ओठ एकमेकांच्या जवळ आलेले दिसले. याशिवाय अनन्या पांडे आणि धैर्य करवा देखील पोस्टरमध्ये खूप गंभीर मूडमध्ये दिसले.

दुसरीकडे, कोव्हिडची परिस्थिती पाहता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली. यानंतर आता हा चित्रपट ११ फेब्रुवारीला ऍमेझॉनवर प्रदर्शित होणार आहे.

दीपिका पदुकोणच्या आधी सिद्धांतने रणवीर सिंगसोबतही काम केले आहे. सिद्धांतने त्याचा पहिला हिट चित्रपट रणवीरसोबत दिला, तो म्हणजे ‘गली बॉय’. सिद्धांतही हा चित्रपट त्याच्या करिअरमध्ये खूप महत्त्वाचा मानतो. आता सिद्धांत दीपिकासोबत पहिल्यांदाच पडद्यावर दिसणार आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा