Saturday, July 6, 2024

‘जिनिलिया तू घाणेरडी आंटी आहेस’, ट्रोलर्सच्या कमेंटवर पती रितेशने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

अभिनेता अरबाज खानचा ‘पिंच २’ हा शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. यामध्ये येणाऱ्या प्रत्येक कलाकाराला त्याच्यावर आलेल्या वाईट कमेंट सांगितल्या जातात. काही कलाकार याकडे दुर्लक्ष करतात, तर काही जण सर्व ट्रोलर्सना चांगलेच उत्तर देतात. अशात या शोमध्ये नुकताच अभिनेता रितेश देशमुख त्याची पत्नी जिनिलिया देशमुख बरोबर आला होता.

हे दोघे शोमध्ये आल्यानंतर अरबाजने यांच्या बरोबर खुप गप्पा मारल्या. त्यांनतर वाईट कमेंट्सचा टप्पा सुरू झाला. यामध्ये अरबाजने जिनिलियाला आलेल्या वाईट कमेंट वाचून दाखवल्या. कमेंट्समध्ये एकाने लिहिले होते की, जिनिलिया तू खूप ओव्हर एक्टिंग करतेस. तुझ्या वयानुसार तू अभिनय केला पाहिजे. तू एक घाणेरडी आंटी आहेस. लहान मुलांना देखील तुझा अभिनय पाहून वाईट वाटत असेल. तू दोन मुलांची आई आहेस तुझ्या वयाचे भान ठेवत जा. या अशा कमेंट ऐकून ती थोडी थक्क झाली. त्यानंतर ती उत्तर देत म्हणाली की, “मला वाटतं त्या व्यक्तीने जेव्हा हे लिहिले असेल तेव्हा त्याच्या बरोबर काही तरी वाईट घडले असेल. मी आशा करते की तुम्ही तुमच्या आयुष्यात सुखी असाल दादा.” (genelia and riteish deshmukh reaction on troller comment saying actress vulgar aunty)

यावर रितेश देखील त्याची प्रतिक्रिया देतो. तो म्हणतो की, “कलाकारांना स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी या गोष्टींचा सामना करावा लागतोच. प्रत्येकाने यासाठी स्वतःला तयार ठेवले पाहिजे. अशा कमेंट करणाऱ्या व्यक्ती स्वतःची पर्सनॅलिटी समोर आणत असतात. मी अशा लोकांना सांगेल लव यू टू माझ्या मित्रा.”

यावर अरबाज पुन्हा एक कमेंट वाचतो आणि सांगतो की, ही सर्व चूक रितेशची आहे. त्याने आपल्या पत्नीवर लक्ष ठेवले पाहिजे. यावर रितेश पहिले हसतो आणि उत्तर देत म्हणतो की, “तुम्ही पण तुमच्या पत्नीवर लक्ष द्यायला पाहिजे, माझ्या नाही.”

या शोमध्ये अरबाज एका पुरस्कार सोहळ्यावेळी प्रीती झिंटा बरोबर झालेल्या एका व्हिडिओची त्या दोघांना आठवण करून देतो. तेव्हा जिनिलिया म्हणते, “मी खूप दिवसानंतर पुरस्कार सोहळ्यामध्ये आले होते. त्यावेळी मला सगळंच थोड वेगळं वाटत होतं. प्रीती रितेशला भेटली, तेव्हा मी त्यांच्याकडे पाहत होते आणि नेमके तेव्हाच एका कॅमेरामॅनचे लक्ष माझ्याकडे होते.” यावर रितेश म्हणतो की, “तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. चाहत्यांना त्यानंतर काय झालं हे पाहण्याची खूप उत्सुकता होती. त्यामुळे आम्ही त्यानंतर काय झाले याचा आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला होता.”

या दोघांनी पोस्ट केलेल्या दुसऱ्या व्हिडिओला देखील प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले. या दोघांची जोडी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. दोघांना एकत्र पाहणे त्यांच्या चाहत्यांना खूप आवडते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-उफ्फ ब्यूटी! तेजस्विनीच्या स्टायलिश लूकने इंटरनेटवर लावली आग, बेडवर बसून देतेय फोटोसाठी पोझ

-शाहरुख खान पुन्हा एकदा दिसणार ‘डबल रोल’मध्ये? जाणून घ्या काय आहे आगामी चित्रपटाची कथा

-उर्वशी रौतेलालाही मिळाला दुबईचा गोल्डन व्हिसा, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

हे देखील वाचा