Saturday, October 19, 2024
Home बॉलीवूड ‘तुमच्याशिवाय माझा एकही दिवस जाणार नाही’, म्हणत जिनिलियाने सासूबाईंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

‘तुमच्याशिवाय माझा एकही दिवस जाणार नाही’, म्हणत जिनिलियाने सासूबाईंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

बॉलिवूडमधील लव्ह बर्ड्स अशी ज्यांची ओळख आहे, ते म्हणजे अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख होय. त्यांचे अनेक रोमँटिक तसेच मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तसेच ते दोघे अनेकवेळा त्यांच्या परिवारासोबत देखील फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांच्या परिवारासोबत असलेली त्यांची बॉंडींग अनेकवेळा आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. रविवारी (१० ऑक्टोबर) रितेशच्या आईचा वाढदिवस आहे. अशातच जिनिलियाने सोशल मीडियावर तिच्या सासूबाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

जिनिलियाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून रितेश आणि तिच्या सासूबाईंसोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्या तिघांमधील बॉंडिंग साफ दिसत आहे. यात रितेशने लाल रंगाचा टी-शर्ट घातला आहे तर जिनिलिया आणि तिच्या सासूने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. (Genelia dreshmukh share photo and give best wishes to her mother in law)

हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई. आपल्यात बाँड शेअर करताना मला खूप आनंद होत आहे. यात आपण हसतो, रडतो आणि सिक्रेट शेअर करतो. आपल्यातील संवाद देखील खूप चांगला आहे. नेहमीच तुम्ही माझ्यासाठी असता, त्यासाठी धन्यवाद. मला माहित आहे तुमच्याशिवाय माझा एकही दिवस जाणार नाही. मी स्वतःला खूप नशीबवान समजते की, मी तुमची सून आहे. खूप खूप प्रेम.”

तिने शेअर केलेल्या या फोटोवर अनेकजण कमेंट करत आहेत. तसेच अनेकजण रितेशच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. तसेच अनेकांना तिने आई म्हटलेल खूप आवडले आहे.

रितेश देशमुखने अनेक चित्रपटात काम केले आहे.‌ तो ‘तुझे मेरी कसम’, ‘धमाल’, ‘हाऊसफुल’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’, ‘एक विलन’, ‘माउली’, ‘मस्ती’, ‘बाघी ३’ यांसारख्या चित्रपटात तो दिसला आहे. तसेच त्याने मराठीमध्ये ‘लय भारी’ या चित्रपटात देखील काम केले आहे. तसेच जिलिनियाने :तुझे मेरी कसम’, ‘जाने तू या जाने ना’, ‘तेरे नाल लव्ह हो गया’, ‘फोर्स’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी माझ्या हृदयाच्या जवळ ठेवते’, म्हणत सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या नात्याबद्दल बोलली कियारा\

-जॅकलिन फर्नांडिसचे ब्लॅक ब्रालेट, शिमरी जॅकेटमधील बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल

-आसामच्या फ्लोरिना गोगोईने पटकावले ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’चे विजेतेपद

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा