Monday, July 1, 2024

जगातील दोन अशा व्यक्तींबद्दल ज्यांना ऑस्कर आणि नोबेल या दोन्ही मानाच्या पुरस्कारांनी केले गेले सन्मानित

लवकरच जगातील संपूर्ण सिनेसृष्टीसाठी अतिशय मनाच्या समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सुरुवात होणार आहे. अमेरिकेतील लॉस अँजेलिसमध्ये होणार हा सोहळा तब्ब्ल तीन वर्षांनी होणार असून कोरोनामुळे हा सोहळा संपन्न झाला नव्हता. या पुरस्कारांसाठी संपूर्ण जागतिक सिनेमाप्रेमी आणि कलाकार प्रचंड उत्सुक आहेत. २७ मार्च रोजी संध्याकाळी या सोहळ्याला सुरुवात होणार असली तरी भारतात मात्र हा सोहळा सोमवारी (२८ मार्च) रोजी सकाळी ५.३० वाजेपासून पाहता येणार आहे. या ९४ व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये देखील नवनवीन रेकॉर्ड बनणार आहेत.

दरवर्षी या पुरस्कारांमध्ये वेगवेगळे रेकॉर्ड बनताना दिसतात आणि काही रेकॉर्ड तर कायम लक्षात राहून जातात. आतापर्यंत या पुरस्कारांमधील सर्वात मोठ्या आणि गजलेलल्या रेकॉर्डबद्दल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. ऑस्कर पुरस्कार आणि नोबेल पुरस्कार हे दोन जगातील सर्वात मोठे मनाचे पुरस्कार समजले जातात. आतापर्यंत जगातील जॉर्ज बर्नार्ड शॉ (George Bernard Shaw) आणि बॉब डिलन (Bob Dylan) या दोनच व्यक्तींना हे दोन्ही पुरस्कार मिळाले आहेत. जाणून घेऊया या व्यक्तींबद्दल.

ऑस्कर आणि नोबेल पुरस्कार का दिले जातात?

जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि मोठा पुरस्कार म्हणून नोबेल पुरस्कार ओळखला जातो. साहित्‍य, शांति, अर्थशास्‍त्र, भौतिक, रसायन, चिकित्‍सा आदी क्षेत्रांमध्ये खास, उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांना हा पुरस्कार दिला जातो. तर ऑस्कर पुरस्कार चित्रपटसृष्टीमध्ये असाधारण आणि मोठी कामगिरी करणाऱ्या लोकांना दिला जातो.

जॉर्ज बर्नार्ड शॉ आणि बॉब डिलन यांनी त्यांच्या जीवनात असे काही असाधारण काम केले ज्यांमुळे त्यांना या दोन्ही पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास २६ जुलै १८५६ मध्ये त्यांचा आयर्लंडमधील डबलिनमध्ये जन्म झाला. पॉलिटिकल ऍक्टिविस्ट होण्यासोबतच ते एक उत्तम नाट्य लेखक होते. त्यांनी चित्रपटांसाठी खूप उत्तम लिखाण केले. १९२५ साली साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. नोबेल प्राइज मिलाळाल्यानंतर ठीक १३ वर्षांनी त्यांना १९३९ साली ‘पिगमेलियन’ या सिनेमासाठी बेस्ट स्क्रीनप्लेचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला होता. हा एक रेकॊर्ड्सचं होता जो अनेक दशकं तसाच होता मात्र २०१६ साली हाच रेकॉर्ड अमेरिकेच्या बॉब डिलन यांनी बनवला.

अमेरिकेमध्ये १९४१ साली जन्मलेले बॉब डिलन हे एक उत्तम गीतकार, लेखक आणि गायक होते. ६० च्या दशकात बॉब मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले. याच काळात अमेरिकेत क्रॉस कल्चरल मुव्हमेंट चालू होती. त्याच काळातील आणि त्याच पिढीतील आवाज म्हणून बॉब ओळखले जाऊ लागले. १६९५ साली आलेल्या बॉब यांच्या ‘लाइक अ रोलिंग स्टोन’ या गाण्यामुळे ते अमेरिकेतील लोकांचे गायक आणि लोकगायक म्हणून ओळखले जाऊ लागले. काळासोबतच त्यांची लोकप्रियता वाढत गेली. २००० साली वंडर बॉयज’ सिनेमातील ‘थिंग्स हव चेंज्ड’ गाण्याला ऑस्करमध्ये बेस्ट ओरिजनल सॉन्ग विभागात पुरस्कार मिळाला. तर २०१६ साली त्यांना साहित्य क्षेत्रातही अतुलनीय कामासाठी नोबेल पुरस्कार प्रदान कऱण्यात आला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा