Friday, July 12, 2024

चित्रपटातील एका आयटम साँगसाठी ‘या’ अभिनेत्री घेतात करोडो रुपये

आपण अनेकदा चित्रपटांमध्ये आयटम सॉंग्स बघत असतो. प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे खेचण्यासाठी, तर कधी कथेची गरज म्हणून अशी गाणी चित्रपटांमध्ये दिसतात. या गाण्यांमध्ये दिग्दर्शक, निर्माते वेगळ्या कलाकारांना घेऊन ते गाणी चित्रित करतात. बॉलिवूडमध्ये पाहिले तर अनेक बड्या अभिनेत्री आयटम सॉंग्स करताना दिसतात. बॉलिवूडसोबतच अनेक प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांमध्ये देखील हा ट्रेंड आता रुजताना दिसत आहे. बॉलिवूडमध्ये तर खूप आधीपासून अशी गाणी बनत आहेत. काही अभिनेत्रींना तर या गाण्यांनीच मोठी लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवून दिली. चित्रपटांमध्ये ५ मिनिटांच्या गाण्यासाठी या अभिनेत्री लाखो, करोडो रुपये घेतात. जी अभिनेत्री जेवढी लोकप्रिय तेवढीच तिची फी जास्त असे समीकरण येथे आहे. आज आपण या लेखातून जाणून घेऊया कोणत्या अभिनेत्री अशा गाण्यांसाठी किती फी घेतात.

नोरा फतेही : 
बॉलिवूडमध्ये नोरा तिच्या एकापेक्षा एक हिट अशा गाण्यांसाठी ओळखली जाते. ती अशी गाणे करूनच लोकांमध्ये तुफान लोकप्रिय झाली. आज नोराचे नाव एका यशस्वी डान्सर म्हणून घेतले जाते. तिला आता तर चित्रपटांमध्ये भूमिका देखील मिळू लागल्या आहेत. नुकतेच नोराचे ‘कुसू-कुसू’ गाणे अमाप लोकप्रिय झाले. ती एका गाण्यासाठी ५० लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम घेते.

समंथा प्रभू :
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेत्री समंथा देखील अनेकदा गाण्यांसाठी चित्रपटांमध्ये दिसते. नुकतेच तिचे पुष्पा सिनेमातील ‘ओ अंतवा…’ गाणे सध्या तुफान गाजताना दिसत आहे, सोबतच या गाण्यावर आधारित अनेक रिल्स देखील तुफान व्हायरल होत आहे. या गाण्यासाठी तब्बल ५ कोटी रुपये घेतले.

सनी लियोनी :
बॉलिवूडमधील सर्वात मादक अभिनेत्री म्हणून सनी लियोनी ओळखली जाते. तिने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये आयटम सॉंग्स केले आहेत. मराठीमध्ये देखील सनी लियोनी आयटम नंबर करताना दिसली होती. तिचे सर्वच गाणे तुफान गाजतात. सनी एका गाण्यासाठी ३ कोटी रुपये घेते.

चित्रांगदा सिंग :
अतिशय सुंदर अभिनेत्री म्हणून चित्रांगदा सिंग ओळखली जाते तिने आतापर्यंत अनेक चांगल्या सिनेमांमध्ये काम केले आहे. याशिवाय तिने काही आयटम सॉंग्स देखील केले आहेत. ती एका गाण्यासाठी ६० लाख घेते.

कॅटरिना कैफ :
बॉलिवूडची बार्बी डॉल म्हणून ओळखली जाणारी कॅटरिना देखील अनेक चित्रपटांमध्ये आयटम सॉंग्स करताना दिसते. ‘शीला की जवानी’, ‘चिकनी चमेली’, ‘सुरैय्या’ आदी अनेक हिट गाणी तिने केली आहेत. ती एका गाण्यासाठी ५० लाख रुपये घेते.

मलायका अरोरा :
बॉलिवूडमध्ये आयटम सॉंग्ससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. मलायकाने आतापर्यंत अनेक हिट चित्रपटांमध्ये आयटम सॉंग्स केले आहेत. ती एका गाण्यासाठी १ कोटी रुपये घेते.

हेही वाचा :

हे देखील वाचा