Saturday, April 19, 2025
Home मराठी Video: ‘बिग बॉस मराठी ३’मध्ये जय आणि गायत्रीला बाईकवरून उतरवताना अक्षय आणि विशालमध्ये वादाची ठिणगी

Video: ‘बिग बॉस मराठी ३’मध्ये जय आणि गायत्रीला बाईकवरून उतरवताना अक्षय आणि विशालमध्ये वादाची ठिणगी

कलर्स मराठीवरील वादग्रस्त आणि प्रसिद्ध शो म्हणून ‘बिग बॉस मराठी’ला ओळखले जाते. याला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून या शोचे तिसरे पर्वही आले आहे. गुरुवारी (३० सप्टेंबर) शोचा नववा दिवस आहे. शोमधील स्पर्धक प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. तसेच घरातील स्पर्धक आता स्वत:चे चांगलेच रंग दाखवू लागले आहेत. असेच काहीसे गुरुवारी पाहायला मिळणार आहे.

घरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून हल्लाबोल हा टास्क सुरू आहे. टीम ए आणि टीम बीमध्ये शाब्दिक युद्ध चांगलेच रंगले आहे. दोन्ही टीममधले सदस्य प्रामाणिकपणे मेहनत घेताना दिसत आहेत. गुरुवारी जय दुधाने आणि गायत्री दातार मोटर बाईकवर बसायला येणार आहेत. तसेच विरुद्ध टीम जिंकण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार यात शंका नाही. (Bigg Boss Marathi 3 Jay Akshay And Vishal Clashes)

विशाल, विकास, मीनल, आविष्कार साबणाचं पाणी टाकून जय आणि गायत्रीला बाईकवरून उठवण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहेत. या टास्कमध्ये ही टीम अजून कोणत्या प्रकारचे प्रयत्न करणार हे पाहायला मिळेल. टास्कदरम्यान अक्षय आणि विशालमध्ये वादाची ठिणगीही पडताना दिसेल. अक्षयच्या आंगावर पाणी टाकल्याने विशाल आणि अक्षयमध्ये बाचाबाची झाल्याचेही दिसेल.. ज्यामध्ये अक्षय विशालला बोलणार आहे की, “मी दुसर्‍यांच्या डोक्याने नाही खेळत.”

त्यामुळे आज हा टास्क कसा रंगणार? जय आणि गायत्री किती वेळ मोटार बाईकवर बसू शकतील? विकास, विशाल, मीनल, आविष्कार, सोनाली आणि सुरेखा हे स्पर्धक त्यांना बाईकवरुन उठवण्यात यशस्वी होतील का?, अशा अनेक प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आजच्या भागात पाहायला मिळेल.

‘बिग बॉस मराठी ३’ चे तिसरे पर्व दररोज रात्री ९.३०. वाजता कलर्स मराठीवर पाहायला मिळेल.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-किर्तनकार शिवलीला पाटील बिग बाॅस मराठीच्या घराबाहेर? पाहा काय आहे नक्की प्रकरण

-पर्सच्या निमित्ताने पुन्हा रंगला अनुपम खेर आणि त्यांच्या आईमध्ये मजेशीर संवाद

-‘या’ कलाकारांनी बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठी निर्मात्यांकडून घेतले होते बक्कळ पैसे

हे देखील वाचा