सध्या जोरदार चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे झी स्टुडिओज आणि नागराज मंजुळे प्रस्तुत, आटपाट निर्मित ‘घर बंदूक बिरयानी‘. नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओजने नेहमीच मराठी सिनेसृष्टीला हटके चित्रपट दिले आहेत. एका सर्वसाधारण विषयाला अनन्यसाधारण बनवणे, ही यांची खासियत आहे. हीच खासियत जपत आता लवकरच हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिरयानी’ प्रदर्शित होणार आहे. यापूर्वीच या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावले. ट्रेलरने या चित्रपटाविषयीची प्रचंड उत्सुकता वाढवली आहे. अशात आता या चित्रपटाचे जाेरदार प्रमाेशन कलाकार करताना दिसत आहेत, ज्या दरम्यानचा एक व्हिडिओ साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे.
‘घर बंदूक बिरयानी’ (ghar banduk birayni) या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी संपुर्ण टीमने पुण्यात हजेरी लावली होती. अशात या कार्यक्रमादरम्यान नागराज मंजुळे (nagraj manjule) हलगी वाजवताना दिसून आले, ज्याच्या तालावर आकाश ठोसर व सायली पाटीलनेही ठेका धरला. ‘घर बंदूक बिरयानी’ प्रमोशनदरम्यानचा हा व्हिडीओ शशांक साने याने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.
नागराज मंजुळें यांचा हलगी वादनाचा व्हिडीओ साेशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल हाेत आहे. अभिनेत्याचा हा हटके अंदाज पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. या व्हिडिओवर साेशल मीडिया युजर्स भिन्नभिन्न कमेंट करून काैतूकाचा वर्षाव करत आहेत.
View this post on Instagram
‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपट 7 एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित हाेणार आहे. या चित्रपटात आकाश ठोसर, सायली पाटील, नागराज मंजुळे व सयाजी शिंदे प्रमुख भूमिकेत आहे. या कलाकारांबद्दल नागराज मंजुळे म्हणतात, “या सगळ्या कलाकारांचे काम मी पाहिले आहे. काहींसोबत काम केले आहे. हे सगळेच कलाकार खूप मेहनती आहेत. सर्वांनीच खूप चांगले काम केले आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील हे कलाकार असल्याने प्रत्येकाची एक वेगळी शैली आहे. त्यामुळे ही बिर्याणी अधिकच चविष्ट होणार आहे.” असे नागराज मंजुळे यांचे म्हणणे आहे.
या चित्रपटची निर्मीती नागराज मंजुळें यांनी केली असून हेमंत अवताडेंनी दिग्दर्शन केलं आहे. (ghar banduk birayni nagraj manjule played halagi actor akash thosar and sayali patil dance video viral )
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दुलारी खेर यांनी केले पीएम मोदी यांच्या पदवीवर भाष्य, नेटकरी म्हणाले ‘केजरीवालांना उत्तर मिळाले’
जान्हवी कपूर बाेल्ड ड्रेस घालून चालत हाेती स्टेजवर; दरम्यान अडखळली अभिनेत्री अन्…