Friday, July 5, 2024

ब्रेकिंग! प्रख्यात गझलकार, गायक काळाच्या पडद्याआड, संगीत विश्वावर शोककळा

प्रसिद्ध गायक आणि गझलकार भूपिंदर सिंह यांचे आज (सोमवार, 18 जुलै) रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पत्नी मिताली सिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे. मागील अनेक दिवसांपासून भूपिंदर सिंह हे विविध आजारांनी त्रस्त होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मुंबई येथे मालवली. त्यांच्या निधनानंतर अनेक कलाकार आणि संगीत क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.

प्रसिद्ध गायक भूपिंदर सिंग यांचे वयाच्या 82 व्या वर्षी मुंबईत निधन झाले. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. गेल्या 9 दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते. आज (सोमवारी) संध्याकाळी उशिरा हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले, असे त्यांची पत्नी मिताली सिंग यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली…

भूपिंदर सिंह यांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील श्रद्धांजली वाहिली आहे. प्रख्यात गायक आणि गझलकार भूपिंदर सिंह यांच्या निधनाबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी गायलेली काही गाणी आणि गझला अविस्मरणीय असून नवोदित गायकांना भूपिंदर सिंह यांचा प्रवास मार्गदर्शक ठरेल असेही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शोकसंदेशात म्हटले आहे. ( Ghazal Singer Bhupinder Singh Passed Away At Mumbai Hospital )

अधिक वाचा
घरगुती हिंसाचारानंतर आता सुरभी तिवारीला पतीपासून घ्यायचाय घटस्फोट, तीन वर्षांपूर्वीच झालं होतं लग्न
जान्हवी कपूरला स्वतःच्याच भावंडांसोबत करायचाय चित्रपट; म्हणाली, ‘टायटल असेल नेपोटिझ्म!’

हे देखील वाचा