Wednesday, February 5, 2025
Home बॉलीवूड जोडी जबरदस्त! अक्षयने त्याच्याच गाण्यावर ‘या’ अभिनेत्रीसोबत लावले ठुमके, चाहत्यांना खूपच आवडला डान्स

जोडी जबरदस्त! अक्षयने त्याच्याच गाण्यावर ‘या’ अभिनेत्रीसोबत लावले ठुमके, चाहत्यांना खूपच आवडला डान्स

बॉलिवूड कलाकार त्यांच्या आगामी सिनेमांचे प्रमोशन करण्यासाठी नेहमीच टीव्हीवरील रियॅलिटी शोमध्ये हजेरी लावत असतात. असेच काहीसे पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार यानेही त्याच्या ‘रक्षाबंधन’ सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी हा फंडा वापरला. अक्षयने रविवारी प्रसारित होणाऱ्या ‘रविवार विथ स्टार परिवार’ या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने मजा-मस्तीही केली. तसेच, त्याने टीव्ही अभिनेत्री आयेशा सिंग हिच्यासोबत ठुमकेही लावले.

अक्षयने आयेशा सिंगसोबत केला डान्स
अक्षय कुमार (Akshay Kumar) याने स्टार प्लसवरील सर्व कलाकारांसोबत जोरदार मजा-मस्ती केली. मात्र, चाहत्यांना सर्वात जास्त आवडले, ते ‘गुम है किसी के प्यार में’मधील सई म्हणजेच आयेशा सिंग (Ayesha Singh) हिच्यासोबत अक्षयने केलेला डान्स. हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसेच, चाहतेही सईसोबत अक्षयला डान्स करताना पाहून सुपर क्रेझी मोडमध्ये दिसले.

सई आणि अक्षयच्या जोडीने जिंकली सर्वांची मने
खरं तर, या खास एपिसोडसाठी सई जोशीची भूमिका साकारणाऱ्या आयेशा सिंग ही ‘तेजाब’ (Tezaab) सिनेमातील अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिच्यासारखी तयार झाली होती. सोशल मीडियावर नेटकरी आयेशा आणि अक्षयच्या या परफॉर्मन्सची प्रशंसा करताना थकत नाहीयेत. एका युजरने व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “मी यातून बाहेर येऊ शकत नाहीये. मला असे वाटते की, मी कधीच यातून बाहेर येऊ शकणार नाही.”

गाण्यांच्या निवडीवर उपस्थित झाले होते प्रश्न
दुसऱ्या एका युजरने व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “हे किती सुंदर आहे.” अनेक युजर्सनी हे ट्वीट करत आयेशा आणि अक्षयच्या जोडीची प्रशंसा केली आहे. मात्र, काही लोक निर्मात्यांनी केलेल्या गाण्याच्या निवडीबद्दल नाराज दिसले. त्यांनी ट्वीट केले की, एवढ्या चांगल्या जोडीला दुसरे कोणते तरी गाणे द्यायला पाहिजे होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-
महिलेला फसवल्यामुळे ‘हा’ कलाकार सापडला कायद्याच्या कचाट्यात, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
‘हा राष्ट्रध्वजाचा अपमान’, अभिनेत्रीने क्रॉप टॉप घालून तिरंगा फडकावल्याने भडकले चाहते, शिकवला चांगलाच धडा
‘या’ बॉलिवूड कलाकारांच्या रक्तातच देशभक्ती! भारतीय सैन्याशी आहे घट्ट नातं

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा