Monday, April 21, 2025
Home अन्य Viral Video : पुष्पा चित्रपटातील ‘ऊ अंटावा’ गाण्यावर मुलीने धरला रस्त्यावरच ठेका, बघ्यांनी केली तौबा गर्दी

Viral Video : पुष्पा चित्रपटातील ‘ऊ अंटावा’ गाण्यावर मुलीने धरला रस्त्यावरच ठेका, बघ्यांनी केली तौबा गर्दी

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा द राईज’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ घातला होता. चित्रपटाची कथा आणि गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. त्यामुळेच या गाण्यावर नेटकऱ्यांचे हजारो रिल्स आणि डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते. चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक महिने उलटून गेले तरी आजही यामधील गाण्यांची लोकप्रियता काही कमी झालेली नाही. सध्या सोशल मीडियावर अशाच एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिने पुष्पा चित्रपटातील ऊ अंटावा गाण्यावर रोडवर केलेला डान्स पाहायला मिळत आहे. 

‘पुष्पा’ चित्रपट प्रदर्शित होऊन बराच काळ लोटला तरी या चित्रपटातील संवाद आणि गाण्यांची क्रेझ कमी झालेली नाही. या गाण्यावर लोक आजही धमाकेदार डान्स करताा दिसत असतात. त्याची सर्व गाणी हिट झाली आहेत आणि लोकांना वेड लावले आहे.महत्वाचे म्हणजे चित्रपटातील गाणी वाजली की आपोआपच लोकांचे पाय थरथरू लागतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लेहेंगा घातलेली मुलगी केस सोडून रस्त्यावर नाचताना दिसत आहे. अल्लू अर्जुन आणि समंथा रुथवर चित्रित झालेल्या पुष्पाच्या ‘ऊ अंटावा’ गाण्यावर ती नाचताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये तरुणी जोरात नाचत असल्याचे दिसत आहे. तिचा डान्स पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. लहान मुले, वृद्ध, तरुण, महिला सर्वच नृत्याचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत. मुलीचा धमाकेदार डान्स पाहून लोक स्वतःहून ठेका धरु लागलेले पाहायला मिळत आहेत. या व्हिडिओला खूप पसंती दिली जात असून आतापर्यंत या व्हिडिओला 9 लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. अनेक नेटकऱ्यांनी व्हिडिओवर फायर आणि हार्ट इमोजी शेअर केले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा