Wednesday, June 26, 2024

GooDNewS! नवीन वर्षात काजल अग्रवाल होणार आई, पती गौतम किचलूच्या पोस्टने दिली आनंदाची बातमी

सर्वांनीच नवीन वर्षाचे स्वागत अगदी धुमधडाक्यात केले. अनेक कलाकारांनी वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचून आपल्या कुटुंबासह नवीन वर्ष साजरे केले. आता नवीन वर्षाच्या सुरुवातीसोबतच दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवालच्या (Kajal Aggarwal) चाहत्यांना खूशखबर मिळाली आहे. अभिनेत्रीचा पती गौतम किचलूने माहिती दिली की, त्याची पत्नी आणि अभिनेत्री काजल लवकरच आई होणार आहे. अभिनेत्री यावर्षी तिच्या पहिल्या मुलाचे स्वागत करणार आहे. भूतकाळातील अनेक अनुमानांनंतर या जोडप्याने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या चाहत्यांसह ही आनंदाची बातमी शेअर केली.

काजलचा पती गौतम किचलूने शनिवारी (१ जानेवारी) त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पत्नी काजल अग्रवालचा फोटो शेअर करत चाहत्यांसह ही बातमी शेअर केली. फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “२०२२ तुमची वाट पाहत आहे.” यासोबतच त्याने गर्भवती महिलेचा इमोजी पोस्ट केला आहे. शेअर केलेल्या या फोटोमध्ये काजल टेबलावर बसलेली दिसत आहे. पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

यापूर्वी काजलने शुक्रवारी (३१ डिसेंबर) तिच्या पतीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये अभिनेत्री तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसली. फोटोमध्ये अभिनेत्री हिरव्या रंगाच्या थाई हाय स्लिट गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत होती. त्याचवेळी गौतम किचलू सेमी कॅज्युअल लूकमध्ये दिसला.

फोटो शेअर करत काजलने लिहिले की, “जेव्हा मी डोळे मिटले तेव्हा मी जुनी झाले होती, मी नव्याने सुरुवात करत आहे. कुटुंबाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. २०२१ साठी धन्यवाद. मला २०२२ मध्ये प्रेमाने जायचे आहे.”

काजल आणि तिच्या पतीने नुकताच त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. या जोडप्याने २०२० मध्ये मुंबईत ऑक्टोबरमध्ये लग्न केले. दोघांनी कोरोना निर्बंधांतर्गत सात फेरे घेतले. या लग्नसोहळ्याला मोजकेच जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा-

हे देखील वाचा