Friday, March 6, 2026
Home बॉलीवूड ‘ज्याला आम्ही लहानाचं मोठं केलं, तोच आमच्या डोक्यावर बसलाय’, भाचा कृष्णावर भडकली गोविंदाची पत्नी

‘ज्याला आम्ही लहानाचं मोठं केलं, तोच आमच्या डोक्यावर बसलाय’, भाचा कृष्णावर भडकली गोविंदाची पत्नी

‘घर म्हटलं की भांड्याला भांड लागणारच’ हे तुम्ही अनेक वेळा ऐकले असेल. अशात कुटुंबामधील वाद, भांडण, मतभेद हे चार भिंतींच्या बाहेर गेले की ते पुन्हा कधीच नाही थांबत. शाब्दिक चकमकींमध्ये दुखावलेली मने पुन्हा कधीच नाही जुळत. तसेच एखादा विषय जास्त ताणला की तो तुटून जातो. असाच काहीसा प्रकार सिनेसृष्टीतील गोविंदा आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेकसोबत झाला आहे.

गेल्या तीन वर्षांपासून या मामा भाच्यांमध्ये वाद सुरू आहेत. सर्वांसाठी आपला मामा खूप प्रिय असतो. परंतु कृष्णाला त्याचा मामा हा कंसमामा वाटतो आहे. तीन वर्षांपासून सुरू असलेला या दोन कुटुंबांमधील वाद अद्याप मिटलेला नाही. जेव्हा यांच्यामध्ये वाद सुरू झाले, तेव्हाच गोविंदाने याविषयी काहीच प्रतिक्रिया न देण्याची शपथ घेतली होती. त्यामुळे त्याने यावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु यावेळी गोविंदाच्या पत्नीने मौन तोडले आहे. (Govinda and Krushna Abhishek dispute govindas wife break silence and say do not want to see see his face)

या दोघांमधील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला तो ‘द कपिल शर्मा शो’मुळे. गोविंदा त्याची पत्नी सुनीता आहूजासह या शोमध्ये झळकणार आहे. परंतु तो येणार म्हणून कृष्णा येथून गायब झाला आहे. हे असे पहिल्यांदाच घडलेले नाही. या आधी देखील साल २०२०मध्ये हे दोघे या शोमध्ये आले होते. तेव्हा देखील त्यांचा भाचा तेथे उपस्थित नव्हता.

यामुळे मामा भाच्यात जुंपली भांडणं
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुनीताने याचा खुलासा केला आहे. ती म्हणाली की, “ही भांडण तीन वर्षांपासून सुरू आहेत. कृष्णाची पत्नी कश्मीराने एक ट्वीट केले होते. त्यामध्ये तिने काही लोक पैशांसाठी डान्स करतात असे लिहिले होते. तिने हे गोविंदासाठीच लिहिले होते.” यावर पुढे सुनीता म्हणाली की, “जेव्हा जेव्हा आम्ही या शोमध्ये येतो, तेव्हा तो स्वतःच्या पब्लिसिटीसाठी आमच्याविषयी काही ना काही बोलत असतो. असं करून काय फायदा आहे? मीडिया समोर कुटुंबातील गोष्टी सांगण्यात काय फायदा आहे? त्याच्या शिवाय देखील आमचा शो हिट होतो, आणि हा सुद्धा होणार. यावर गोविंदा कोणत्याही प्रतिक्रियेतून व्यक्त होत नाही.”

त्याचे विनोद मामा शिवाय पूर्ण नाही होत
यावेळी तिने कृष्णाच्या विनोदांवर देखील निशाणा साधला. ती म्हणाली की,” त्याचा एकही विनोद मामा शिवाय पूर्ण नाही होत. माझा मामा असा, माझा मामा तसा. त्याच्याकडे एवढी देखील प्रतिष्ठा नाही आहे, की मामाचे नाव न घेता शो हिट करेन?

पुढे दोन्ही कुटुंबातील वाद कधी संपणार? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा गोविंदाची पत्नी म्हणाली की,”ते कधीच नाही होणार. तीन वर्ष आधी देखील मी सांगितलं होतं, हा असा वाद आहे जो मी जिवंत असेपर्यंत नाही सुटणार. ज्यांना आम्ही पोसलं, लहानाचं मोठं केलं, तेच आज आमच्या डोक्यावर बसले आहेत. नेहमी त्यांचा मूर्खपणा सुरू असतो. जर माझ्या सासूच्या निधनावेळी आम्ही कृष्णाला घर सोडून जा, असे सांगितले असते तर? ज्यांनी मदत केली, आसरा दिला हे लोक त्यांच्याशीच मूर्खपणा करत आहेत. मी फक्त एवढेच सांगेन हे भांडण कधीच सुटणार नाही आणि मला आयुष्यात त्यांच तोंडही नाही बघायचं.

या आधी कृष्णाला देखील एका मुलाखतीमध्ये या विषयी विचारण्यात आले होते. तेव्हा तो म्हणाला की, “मी आणि माझ्या मामामध्ये तीन वर्षांपासून भांडणे सुरु आहेत. त्यामुळे अजूनही आमच्यामधील तणाव कायम आहे.” मामा आणि भाच्यातील वादाची झळ दोंन्ही कुटुंबाना बसत असल्याचं दिसत आहे. तसेच आता पुढे ‘द कपिल शर्मा शो’मध्ये गोविंदा आल्यावर काय होणार याकडेच चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अनुराग यांनी दिले अनेक सुपरहिट चित्रपट, मात्र अपयशी ठरले वैयक्तिक आयुष्य; वाचा त्यांच्याबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी

-‘ये रिश्ता क्या कहलाता है’चा नैतिक करतोय त्याचा वाढदिवस साजरा, जाणून घ्या संपूर्ण कारकीर्दप्रवास

-‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या सेटवर एन्जॉय करताना दिसले ‘ही मॅन’; चहा पित म्हणाले, ‘चीयर्स!’

हे देखील वाचा