बॉलीवुड अभिनेता गोविंदा (Govinda) चे भाचा कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) आणि त्याची पत्नी कश्मीरा शाह (Kashmera Shah) सोबतचे नातेसंबंध ताणले गेले होते. दोघांच्या कुटुंबादरम्यान मतभेद असल्याच्या गोष्टी 2016 मध्ये समोर आल्या होत्या. तेव्हा याबाबत गोविंदा म्हणाला होता, की त्याला कृष्णाविषयी कुठलीच तक्रार नाही. अर्थात, त्याआधी कृष्णाने एका पॉडकास्ट शोमध्ये आपला मामा गोविंदाची जाहीर माफीही मागितली होती. यानंतर असे दिसते, की दोघांमधली दरी आता बुजली आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गोविंदाचा भाचा विनय आनंद याने (Vinay Anand) मामा-भाच्याच्या एकत्र येण्यातून घडणाऱ्या विविध कौटुंबिक गोष्टी आणि इतर मुद्द्यांवरही प्रकाश टाकला. विनय आनंद हे भोजपुरी सिनेमाचे (Bhojpuri Cinema) लोकप्रिय अभिनेते आहेत. आता विनय हे ‘मकान’ (Makaan) या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा बॉलीवुडमध्ये कमबॅक करणार आहेत. या वादाबाबत विनय यांनी माध्यमांना अनेकदा सांगितले होते, की रियल लाईफ आणि रील लाईफ या दोन वेगळ्या गोष्टी असतात.
विनय आपला भाऊ कृष्णा यांच्यामुळे थोडा निराश वाटतो आहे. विनय यांची इच्छा होती, की त्यांच्या कुटुंबातील सगळे मतभेद दूर व्हावेत. सगळे हसत खेळत एकमेकांसोबत रहावेत. या वादासंदर्भानेच विनयने सोशल मीडिया मंच Koo (कू ऐप) वर घोषणा केली, की आता कृष्णा आणि गोविंदा यांच्यात कसलाही वाद नाही. गोविंदा हेसुद्धा म्हणालेत की, “आता कृष्णाला माफी मागायची गरज नाही. तो पूर्वी जसा मोकळेपणाने बोलायचा, तसेच आताही बोलावे, वागावे. हा घरगुती विषय होता आणि आता तो संपला आहे,” विनय यांनी यानंतर लिहिले की कृष्णा माझा सर्वात आवडता छोटा भाऊ आहे आणि गोविंदा माझे मामा आहेत. मी त्यांचा खूप आदर करतो.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- हेही वाचा-
- खर कौतुक मेल्यानंतरच होत! हत्येनंतर रिलीज झालेले सिद्धू मूसेवालाचे गाणे तुफान व्हायरल, इतक्या लोकांनी पाहिला व्हिडिओ
- ‘हाच खरा हाय वाघ…’ अभिनेत्री हेमांगी कवीच्या ‘त्या’ दोन फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत
- कॅरी मिनाटी ते प्राजक्ता कोहली, ‘हे’ लोकप्रिय युट्यूबर गाजवतायेत बॉलिवूड इंडस्ट्री, पाहा संपूर्ण यादी