अभिनेता आमीर खानचा (Aamir Khan) ‘लगान‘ चित्रपट प्रचंड गाजला. हिंदी सिने जगतातील एक अप्रतिम कलाकृती म्हणून या चित्रपटाकडे पाहिले जाते. या चित्रपटात अभिनेता आमीर खानची भूमिका तर गाजलीच त्याचबरोबर चित्रपटातील अभिनेत्री ग्रेसी सिंगच्या (Gracy Singh) अभिनयाचेही प्रचंड कौतुक झाले होते. या चित्रपटातून रातोरात स्टार झालेल्या अभिनेत्री ग्रेसी सिंगचा (20जुलै) हा जन्मदिवस. जाणून घेऊ या अभिनेत्रीच्या सिने जगतातील प्रवासाबद्दल.
अभिनेत्री ग्रेसी सिंगचा जन्म 20 जुलै 1980ला दिल्ली मध्ये झाला. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या ग्रेसी सिंगने आपल्या अभिनय कारकिर्दिला टेलिव्हिजनवरुन सुरूवात केली. ग्रेसीने 1997मध्ये ‘अमानत’ या मालिकेतून अभिनय जगतात पाऊल ठेवले. या मालिकेने तिला फारशी लोकप्रियता मिळवून दिली नसली तरी तिच्या अभिनयाची मात्र सर्वत्र चर्चा सुरू झाली होती. यामुळेच तिला चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. ग्रेसीने ‘हू तू तू’ आणि ‘हम आपके दिल में रहतें है’ या चित्रपटातही काम केले. मात्र ग्रेसीला खरी ओळख आशुतोष गोवारीकर यांच्या ‘लगान’ चित्रपटाने मिळवून दिली. या चित्रपटात ती अभिनेता आमिर खानसोबत दिसली होती. चित्रपटात ग्रेसीने गौरीची भूमिका साकारली होती.
‘लगान’ चित्रपटाच्या दमदार यशाने अभिनेत्रीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातून ग्रेसी रातोरात स्टार झाली. मात्र जरी लगान चित्रपटाने अभिनेत्रीला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली असली तरी तिच्यावर एक घमंडी अभिनेत्रीचाही शिक्का लावण्यात आला होता. कारण या चित्रपटात गावच्या मुलीची भूमिका साकारण्यात ती इतकी मग्न झाली होती की ती सेटवर कोणाशीही बोलत नव्हती. त्यामुळेच तिला एक घमंडी अभिनेत्री आहे असे म्हणू लागले.
लगानच्या यशानंतर ग्रेसी ‘लगे रहो मुन्ना भाई’ मध्ये संजय दत्तसोबत तर ‘गंगाजल’ चित्रपटात अभिनेता अजय देवगणसोबत झळकली. या दमदार चित्रपटानंतर अभिनेत्री सिने जगतात चांगलीच यशस्वी होणार असेच अंदाज सर्वजण बांधत होते. मात्र काही काळाने ग्रेसी सिने जगतापासून दूर गेली. ज्याचे कारण मात्र तिने कधीही सांगितले नाही. यानंतर अभिनेत्रीने संतोषी मा मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन केले. सध्या ती अविवाहीत असून ब्रह्मकुमारी संस्थेसोबत काम करते.
अधिक वाचा-
–शाहरुखच्या बंगल्यापेक्षाही जास्त संपत्तीचे मालक आहेत नसीरुद्दीन शाह, महिन्याला एक, तर वर्षाला कमावतात १२ कोटी
–‘या’ दिग्गज कलाकारांचे सुरुवातीचे वेतन ऐकून व्हाल थक्क, अगदी शुन्यातून केली होती सुरुवात