Tuesday, July 9, 2024

धक्कादायक! इंडियन लाफ्टर चॅलेजमधील ‘या’ प्रसिद्ध कॉमेडीयनवर बलात्काराचा आरोप दाखल

प्रसिद्ध स्टॅडअप कॉमेडियन आणि आम आदमी पक्षाचा ( आप ) कार्यकर्ता ख्याली सहारन संदर्भात एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. ख्याली सहारनवर बलात्काराचा मोठा आरोप करण्यात आला आहे. एका महिलेने नोकरी देण्याचे आमिष दाखवून हॉटेलमध्ये तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला असल्याचे सांगितले आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून मानसरोवर पोलिसांनी ख्याली सहारनवर गुन्हा दाखल करत कारवाईला सुरुवात केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना १३ मार्च रोजी जयपूर येथे घडली. जेव्हा कॉमेडियन ख्यालीने एका महिलेला मानसरोडवर परिसरातील एका हॉटेल रूममध्ये बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला. महिलेने केलेल्या आरोपावरून पोलिसांनी ख्यालीवर कलम ३७६ (बलात्कार)च्या अंतर्गत गुन्हा दाखल केट चौकशीला सुरुवात केली आहे.

दरम्यान श्रीगंगानगर येथील एक महिला मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होती. पण, तिला नवीन नोकरीची गरज असल्याने ती तिच्या सोबतच्या दुसऱ्या महिलेच्या माध्यमातून कॉमेडियन ख्यालीच्या संपर्कात आली.१३ मार्च रोजी ख्यालीने त्या पीडित महिलेला हॉटेलमध्ये बोलवले. ख्यालीने हॉटेलमध्ये दोन रूम बुक केल्या होत्या. त्यानंतर ख्यालीने मद्याचे सेवन करत महिलांनाही जबरदस्तीने पिण्यास सांगितले. पुढे त्यातील एक महिला त्या रूममधून निघून गेली. त्यानंतर ख्यालीने दुसऱ्या महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला.

दरम्यान, याप्रकरणावर आम आदमी पक्षाचे प्रवक्ता योगेंद्र गुप्ता यांनी याबाबत बोलताना म्हटले की, “आपचे लाखो कार्यकर्ते आहेत. त्यातील ख्याली एक आहे. ख्याली स्वत:च्या आयुष्यात काय करतो, याचा पक्षाशी काहीही संबंध नाही.” तत्पूर्वी ख्याली हा द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज सिझन २ चा भाग होता. त्यानंतर तो कॉमेडी सर्कस आणि कपिल शर्मा शोमध्ये देखील दिसला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भारतातील मुलींच्या लग्नाच्या अवाजवी अपेक्षेवर सोनाली कुलकर्णी म्हणाली “मुलगा हवाय की मॉलमधील ऑफर?

स्वराच्या कव्वाली नाईट फंक्शनमध्ये पोहोचले अखिलेश यादव, अभिनेत्री पाेस्ट शेअर करत म्हणाली…

हे देखील वाचा