Wednesday, August 6, 2025
Home वेबसिरीज जबरदस्त! ‘या’ अभिनेत्रीने चक्क साडी नेसून मारले ‘पुश अप्स’, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

जबरदस्त! ‘या’ अभिनेत्रीने चक्क साडी नेसून मारले ‘पुश अप्स’, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

गुल पनाग ही बॉलीवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रतिभावान कलाकार म्हणून ओळखली जाते. यासोबतच गुल आपल्या फिटनेस साठी देखील प्रसिद्ध आहे. गुल सोशल मीडियावर खूप ऍक्टीव्ह असते. तिच्या व्यायामाचे अनेक व्हिडिओ ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. गुलने अलीकडेच एक व्हिडिओ पोस्ट केला. ह्या व्हिडिओमुळे गुल चांगलीच चर्चेत आली आहे. तिने पोस्ट केलेल्या व्हिडिओ मध्ये गुल साडी नेसून पुश अप्स करत आहे. गुलला साडीमध्ये पुश अप्स करताना पाहून लोकांना तिचे खूप अप्रूप वाटत असून, हा व्हिडिओ पाहून गुल च्या फॅन्स सोबतच इतर लोकंही तिचे कौतुक करत आहे.

 

सेलिब्रिटी स्वतःला फिट ठेवण्यासाठी तासंतास व्यायाम आणि पौष्टिक जेवण घेत असतात. गुल देखील अशीच आहे. तिच्या साडी नेसून पुश अप्स करत असतांनाच व्हिडिओ याचे एक उत्तम उदाहरण आहे. गुल तिच्या फिटनेस बाबत किती जागरूक आहे आणि फिटनेस बद्दल तिची किती निष्ठा आहे हे ह्या व्हिडिओ मधून आपणास समजते.

खरंतर नेहमी व्यायाम करणाऱ्या माणसाला पुश अप्स करणे खूप अवघड वाटत नाही. मात्र साडीत पुश अप्स करणे हे निव्वळ अवघड आहे. परंतु गुलने हे अवघड काम अगदी सहज सोपे करत हे काम पूर्ण केले. हा व्हिडिओ शेयर करताना गुलने ‘कधीही आणि कुठेही’ असे शीर्षक दिले आहे. सोबतच गुलने ‘सेट लाइफ, एक्टर लाइफ, रील्स, रील इट फील इट, रील करो फील करो’ असे हॅशटॅग देखील वापरले आहेत. जर गुलचे सोशल मीडिया अकाउंट पाहिले तर ते संपूर्ण अशा फिटनेस व्हिडिओने भरलेले आहे.

गुलच्या वर्कफ्रंट बददल सांगायचे तर गुलला आपण शेवटचे ‘पाताललोक’ या वेबसिरीज मध्ये पाहिले होते. सोबतच ती मनोज वाजपेयींच्या ‘द फॅमिली मॅन’ या वेबसिरीजमध्ये सुद्धा झळकली होती. याशिवाय गुलने ‘डोर’, ‘हॅलो’, ‘धूप’, ‘अबतक छप्पन २’ या आणि अशा अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

हे देखील वाचा