Monday, July 15, 2024

मध्यमवर्गीय कुटुंबातील समस्या हलक्या फुलक्या पद्धतीने बघण्यासाठी सज्ज व्हा, येत आहे ‘गुल्लक ३’

सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणजे प्रेक्षकांसाठी त्यांच्या आवडीचे मनोरंजन बघण्याचे एक उत्तम साधन बनले आहे. प्रेक्षकांचे ज्या कलाकृतीला प्रेम मिळते त्या कलाकृतीचे वेगवेगळे पर्व आपल्याला वेबसिरीजच्या रूपाने पाहायला मिळतात. या माध्यमावर प्रेक्षकांना ऍक्शन, कॉमेडी, थ्रिलर, सस्पेन्स, क्राईम आदी विविध प्रकारच्या सिरीज पाहायला मिळतात. मात्र या सर्व प्रकारच्या सिरीजमध्ये ‘गुल्लक’ या सिरीजने तिचे वेगळेपण सिद्ध केले. या सिरिजला तुम्ही तुमच्या संपूर्ण परिवारासोबत बसून बघू शकतात. ‘गुल्लक’ या सिरीजमधील कलाकारांच्या अभिनयाने एका सामान्य परिवारातील स्थितीला अतिशय उत्तम मांडले आहे. या सिरीजचे आधीच दोन सिझन आले होते आणि या दोन्ही सिझनने प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन केले. आता पुन्हा एकदा ही सिरीज प्रेक्षकांना हसवण्यासाठी तिसरा सिझन घेऊन आली आहे.

मागील दोन्ही पर्वाना मिळालेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद ‘मिश्रा कुटुंबाला’ पुन्हा एकदा नवीन किस्स्यांसोबत घेऊन आला आहे. या सिरीजमध्ये एका मध्यम वर्गीय परिवारातील नवीन जुन्या टिकणाऱ्या मोडणाऱ्या नात्यांवर आणि त्यातील समस्यांना अतिशय हलक्या फुलक्या पद्धतीने दाखवले गेले आहे. ही सिरीज बघताना नक्कीच प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू उमटेल. या सिरीजमध्ये विविध कथा दाखवण्यासाठी मजेशीर किस्स्यांना दाखवण्यात आले आहे. गुल्लक च्या तिसऱ्या पर्वात कुटुंबातील मोठ्या मुलाचा पगार आणि त्यावर आधारित किस्से दाखवले गेले आहेत.

‘गुल्लक’ ही एक विनोदी पारिवारिक सिरीज असून, जमील खान, गीतांजलि कुलकर्णी, वैभव राज गुप्ता, हर्ष मायर आणि सुनीता रजवार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. गुल्लक ३ चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून, याला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. येत्या ७ एप्रिलला ही सिरीज प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा