Tuesday, July 9, 2024

भगवान शंकराच्या मंदिरासमोरच केली गेली त्यांच्या ‘या’ निस्सीम भक्ताची क्रूर हत्या

टी-सीरीजचे संस्थापक गुलशन कुमार ( Gulshan kumar)  हे भगवान शंकराचे परम भक्त होते. त्यांनी भगवान शंकरावर अनेक अल्बम बनवले, जे आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने ऐकायला मिळतात. गुलशन कुमार यांनी भोले शंकराची अनेक मंदिरेही बांधली. नागेश्वर मंदिराची पुनर्बांधणीही त्यांनी करून दिली. मंदिराच्या आवारात भव्य ध्यानमंदिर आणि पद्मासन मुद्रामधील शिवप्रतिमा बसवण्यात आली आहे. प्रचंड संघर्षमय जीवन जगल्यानंतर त्यांनी आपल्या संगीत क्षेत्रातील मेहनतीने एक विशेष स्थान प्राप्त केले होते, परंतु काही लोकांना त्यांची ही प्रगती आवडली नाही. याच कारणामुळे त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. गुलशन कुमार दररोज शिवमंदिरात जाऊन प्रार्थना करायचे. 12 ऑगस्ट रोजी नेहमीप्रमाणे ते शिवपूजनासाठी घराबाहेर पडले होते. मात्र तो दिवस त्याच्या आयुष्यातील शेवटचा दिवस असणार आहे याची त्यांना कल्पनाही नव्हती. 12 ऑगस्ट 1997 रोजी जीतेश्वर महादेव मंदिराबाहेर त्यांचा मृतदेह 16 गोळ्यांनी छिन्नविछिन्न झाला होता.

गुलशन कुमार यांच्या हत्येची माहिती पोलिसांना गुप्तचर विभागाने आधीच दिली असली तरी त्याची गांभीर्याने दखल घेण्यात आली नाही. त्यांचा मारेकरी अबू सालेमला माहीत होते की गुलशन कुमार रोज सकाळी घरातून बाहेर पडण्यापूर्वी शिवमंदिरात जातात. यादरम्यान त्यांना मारण्याची योजना आखण्यात आली होती. गुलशन कुमार ज्या दिवशी मारले गेले, त्यादिवशी ते उत्तर प्रदेश पोलिसांनी नेमलेल्या बंदूकधारी रक्षकाशिवाय मंदिरात गेले होते. कारण तो काही दिवसांपूर्वी आजारी पडला होता.

त्यादिवशी सकाळी ठीक 10:40 वाजता त्यांनी मंदिरातील पूजा उरकली, ते आपल्या गाडीच्या दिशेने निघाले आता, लांब केस असलेला एक अनोळखी माणूस त्यांच्या जवळ येऊन उभा राहिला आणि तो ओरडला आणि म्हणाला – “खूप पूजा केली आहे. आता पूजा करण्यासाठी वर जा.” एवढे बोलत त्याने गुलशन कुमार यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळी थेट त्याच्या डोक्यात लागली. आणि त्यांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाने अब्दुल रौफ मर्चंट आणि अब्दुल रशीद यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

शशांक केतकरने दिली भारतीयांना लंडनमध्ये जॉबची संधी; मिळणार २८ लाख पगार, व्हिडिओ शेअर करत म्हणाला…

परिणीती आणि राघव चड्ढा यांनी घेतला आयपीएल सामन्याचा आनंद; स्टेडियममध्ये घुमला ‘परिणीती भाभी’चा नाद, व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा