Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

भल्याभल्यांना मागे टाकत 8 वर्षीय गुंजन बनली ‘झलक दिखला जा 10’ची विनर, जिंकले ‘एवढ्या’ लाखांचे बक्षीस

छोट्या पडद्यावरील ‘झलक दिखला जा 10‘ या प्रसिद्ध डान्स शोचा ग्रँड फिनाले पार पडला. या शोला एका चिमुकलीच्या रूपात विजेता स्पर्धक मिळाला आहे. तो स्पर्धक इतर कुणी नसून 8 वर्षीय गुंजन सिन्हा आहे. गुंजन हिने या शोमध्ये भल्याभल्यांना मागे टाकत दहाव्या पर्वाचे विजेतेपद पटकावले. यासोबतच तिच्यावर ट्रॉफी आणि लाखो रुपयांच्या बक्षीसांचा वर्षावही झाला.

लाखो रुपयांच्या बक्षीसाचा वर्षाव
‘झलक दिखला जा 10’ या शोचे परीक्षक माधुरी दीक्षित, करण जोहर, टेरेन्स लुईस आणि नोरा फतेही यांनी 20 लाख रुपयांची रोख बक्षीस रक्कम आणि चमचमती ट्रॉफी विजेत्या गुंजन सिन्हा (Gunjan Sinha) हिच्याकडे सोपवली. आता यादरम्यानचे काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये 8 वर्षीय गुंजन सिन्हा खूपच खुश असल्याचे दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gunjan Sinha (@gunjansinhaoriginal)

गुंजन सिन्हा ही गुवाहाटीची राहणारी आहे. तिचा कोरिओग्राफर तेजस वर्मा आणि सागर बोरा आहे. यांनी रुबीना दिलैक हिला चांगलीच टक्कर देत हे पर्व आपल्या नावावर केले. या विजयानंतर गुंजन खूपच खुश असल्यासोबतच ती हैराणदेखील आहे. तसं पाहिलं, तर यापूर्वीही गुंजन डान्स रियॅलिटी शोमध्ये दिसली आहे. तिच्या डान्स मूव्हजचे प्रत्येकजण चाहते आहेत. तिने म्हटले आहे की, या शोनंतर ती चांगली डान्सर बनली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

आता शिक्षणासोबत डान्सवरही देणार लक्ष
गुंजन हिने सांगितल्याप्रमाणे आता ती लवकरच तिच्या शहरात परतणार आहे. ती सध्या तिच्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत करणार आहे. तिने सांगितले आहे की, “मी माझे शिक्षण कधीच सोडले नाही. कारण, मी ऑनलाईन क्लासेस करत होते. मात्र, मी शाळेत आपल्या मित्रमंडळींना भेटण्यासाठी खूपच उत्सुक आहे. मी माझे शिक्षण पूर्ण करण्यासोबतच डान्सवरही लक्ष देत राहील.”

कुटुंबीयांकडून गुंजनला हवीये ‘ही’ गोष्ट
आपल्या आई-वडिलांचे नाव रोशन केल्यामुळे गुंजन खूपच खुश आहे. तिने सांगितले आहे की, “लोकांना अजूनही विश्वास बसत नाहीये. माझ्या विजयाने त्यांना खुश आणि भावूक केले आहे. आम्ही एका साहसी उद्यानात जाण्याचा विचार करत आहोत. मी माझ्या आई-वडिलांना सांगितले आहे की, मला एल्साचे घर (फ्रोझन चित्रपटातील) भेट म्हणून हवे आहे. त्यांनी काही वर्षांपूर्वी मला ती भेटवस्तू देण्याचे वचन दिले होते.”

गुंजनने असेही म्हटले आहे की, तिला आंतरराष्ट्रीय नृत्य मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करायचे आहे. गुंजनने कमी वयात मिळवलेल्या या यशामुळे चोहो बाजूंनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (gunjan sinha won jhalak dikhhla jaa season 10 got trophy 20 lakh cash prize)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शिल्पा शेट्टीने मुंबईच्या रस्त्यावर वाटला पिझ्झा, व्हिडिओ पाहून युजर्सनी केल्या भन्नाट कमेंट्स
लग्नात अडकण्यापूर्वी बॅचलर पार्टी एन्जॉय करतेय ‘ही’ अभिनेत्री, सोशल मीडियावर फोटोंचा कहर

हे देखील वाचा