Friday, April 25, 2025
Home टेलिव्हिजन गर्दीतून देबीनाला सहीसलामत बाहेर काढताना गुरमीत चौधरी झाला जखमी, व्हिडिओ झाला व्हायरल

गर्दीतून देबीनाला सहीसलामत बाहेर काढताना गुरमीत चौधरी झाला जखमी, व्हिडिओ झाला व्हायरल

मनोरंजनविश्वातील अनेक जोड्या दर्शकांना तुफान आवडतात. आपल्या आवडत्या जोडीबद्दल जाणून घ्यायला त्यांना फार आवडते, त्यासाठी ते त्यांना सोशल मीडियावर फॉलो करतात. अशीच एक प्रेक्षकांची सर्वात आवडती जोडी म्हणजे देबीना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी. या दोघांना तुफान फॅन फॉलोविंग आहे. सोशल मीडियावर सतत त्यांचे विविध फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होताना आपण बघतो. असाच एक या दोघांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. या व्हिडिओमध्ये गुरमीत आणि देबीना चाहत्यांच्या गराड्यात दिसून येत आहे. यावेळी चाहत्यांपासून देबिनाला वाचवण्याच्या प्रयत्नात गुरमीत जखमी झाला.

झाले असे की गुरमीत आणि देबीना नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांच्या फॅन्सने त्यांना बघण्यासाठी आणि त्यांना कॅमेऱ्यांमध्ये कैद करण्यासाठी एकच गर्दी केली. त्या दोघांना चहुबाजूने घेरले अशा वेळी आपल्या पत्नीला त्या गर्दीतून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी गुरमीतने स्वतः पुढाकार घेतला यावेळी त्याला पायाला जखम देखील झाली. सध्या त्यांचा हाच व्हिडिओ चांगलाच गाजत आहे. या व्हिडिओवरून अनेक नेटकरी त्याचे कौतुक करत आहे तर काहींनी त्यांना ट्रोल देखील केले.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

तत्पूर्वी देबीना आणि गुरमीत यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाल्यास दोघांसाठी २०२२ हे वर्ष खूपच खास होते याच वर्षी दोघांना दोन मुली झाल्या. देबीनाने सांगितले होते की अथक प्रयत्नांनी त्यांना मुली झाल्या आहेत. त्यामुळेच या २०२२ वर्षाने गुरमीत देबीनाला सर्वात जास्त आनंद दिला आहे. गुरमीत विविध म्युझिक व्हिडिओमधून दिसत असतो. तर देबीना सोशल मीडियावर सतत तिचे व्हलॉग पोस्ट करत सर्व माहिती फॅन्ससोबत शेअर करताना दिसते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कडक! शिवानी बावकरचे फोटो पाहून लागिर झालं जी
रश्मी देसाईचा हटके लूक! चाहत्यांना पाडतोय भुरळ, पाहा फोटो गॅलरी

हे देखील वाचा