Monday, July 1, 2024

कोणी उडवला थरकाप, तर कोणी पाडली भुरळ; पाहा ‘या’ अभिनेत्रींचा लक्षवेधी ‘हॅलोविन लूक’

हॅलोविन वीक कसा साजरा करायचा, हे बॉलिवूड अभिनेत्रींना चांगलेच माहीत आहे. शिल्पा शेट्टी, माधुरी दीक्षित यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्रींनी आपला हॅलोविन लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. काही खूप सुंदर दिसत आहेत, तर काही खूप भयानक दिसत आहेत. काही अभिनेत्रींचा हा भुताचा लूक पाहून तुमचाही थरकाप उडाल्या शिवाय राहणार नाही.

शिल्पा शेट्टी आपल्या भयावह लूकने कोणालाही घाबरवू शकते. अभिनेत्रीचा हा लूक पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.

Photo Courtesy: Instagram/viralbhayani

 

सोफी चौधरी एखाद्या व्हॅम्पायरसारखी दिसत आहे, तिच्या तोंडातून रक्त टपकताना दिसत आहे. ( halloween party fans scared to see shilpa shetty ghostly look many actresses appeared with scary faces)

Photo Courtesy: Instagram/sophiechoudry

 

माधुरी दीक्षितने फेस मास्क घातला आहे, ज्यामध्ये ती नेहमीप्रमाणे खूप सुंदर दिसत आहे. या लूकमध्ये तिला ओळखणे थोडे कठीण आहे.

Photo Courtesy: Instagram/madhuridixitnene

 

हॅलोविनसाठी जॅकलिन फर्नांडिसने जलपरीचा लूक निवडला, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Photo Courtesy: Instagram/jacquelinef143

 

मौनी रॉय देखील दुबईतील एका हॅलोविन पार्टीत सहभागी झाली होती, ज्याचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले होते.

Photo Courtesy: Instagram/imouniroy

 

दिव्या अग्रवाल तिच्या हॅलोविन लूकसह रस्त्यावर फिरताना दिसली, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Photo Courtesy: Instagram/viralbhayani

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कातिलाना! सोनालीने सादर केला तिचा ‘हॅलोविन’ लूक; चाहते सोडा, सेलिब्रिटीही पडतायत तिच्या प्रेमात!

-शिल्पा शेट्टीला सोशल मीडियावरील ‘हा’ ट्रेंड समजलाच नाही, तरीही केला एक हटके व्हिडिओ

-लग्नाच्या रिसेप्शनमध्ये केवळ ‘या’ अभिनेत्याला ओळखू शकले होते श्रीराम नेने, माधुरी दीक्षितने केला खुलासा

हे देखील वाचा