,साऊथ अभिनेत्री हंसिका मोटवानी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. त्यांच्या लग्नाआधीचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी मुंबईत माता की चौकी लावली होती. या पूजेत केवळ त्यांचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी सहभागी झाली होती. या फंक्शनमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती. तर तिचा भावी पती सोहेलने मॅचिंग कुर्ता पायजमा घातला होता. माता की चौकीनंतर ही अभिनेत्री बॅचलोरेट पार्टी करताना दिसली आहे. ज्याचे काही फोटो सोशल मीडियावर चांगलीच क्रेज करत आहेत.
नुकताच हंसिका मोटवानी (Hansika Motwani) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम उकाउंवर बॅचलर पार्टीचे काही फोटो आणि एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती मैत्रीणिंच्या घोळक्यामध्ये मस्ती करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. अभिनेत्री मुलींच्या गँगसोबत सुंदर लोकेशन एक्सप्लोर करत आहे. त्यात त्यांनी डान्स आणि खूप धमाल केल्याचे दिसून आले.
व्हिडिओमध्ये हंसिकाने पांढरा शर्ट, सिल्व्हर कलरचा शॉर्ट स्कर्ट आणि पांढरा शूज घातलेला दिसत आहे. अभिनेत्रीच्या डोक्यावर एक ब्राइड बॅंड दिसत आहे. बॅकग्राउंडमध्ये फिल्लौरीचे ‘दिन शगना दा’ हे गाणे वाजत आहे. माध्यमातील वृतांनुसार, लग्नानंतर हंसिका मोटवानी नॉर्दर्न लाइट्स पाहण्यासाठी सोहेल कथुरिया (Sohel Kuthariya) सोबत हनीमूनला जाऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून हंसिकाच्या बकेट लिस्टमध्ये नॉर्दर्न लाइट्सचा समावेश आहे.
हंसिका आणि सोहेलचे लग्न (दि, 4 डिसेंबर 2022) रोजी होणार आहे. हंसिकाच्या लग्नापूर्वीचे मेहेंदी आणि संगीत विधी 3 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. तर (दि,2 डिसेंबर) रोजी सुफी नाईटचेही आयोजन करण्यात येणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडमधील सिमरनचा सोज्वळ लूक चाहत्यांना करतोय घायळ, पाहच फोटो गॅलरी
अर्चना गाैतमने बिग बाॅसला चांगलेच धमकावले; म्हणाली, ‘आता अती हाेतंय’