Wednesday, June 26, 2024

‘यारियां’ चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेला हिमांश करायचा ‘रेडिओ जॉकी’ची नोकरी, नेहा कक्करवर होते जीवापाड प्रेम

हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकून आपली कारकीर्द घडवण्यासाठी प्रयत्न करणारे अनेक कलाकार आहेत. मात्र, यांपैकी काही कलाकार असेही आहेत, ज्यांची चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वीची पार्श्वभूमी काही औरच होती. म्हणजेच, ते इतर ठिकाणी नोकरी करायचे. मात्र, त्यांना चित्रपटसृष्टीत येण्यासाठी आपल्या कामाचा त्याग करावा लागला होता. यापैकीच एक अभिनेता म्हणजे हिमांश कोहली होय. हिमांश शुक्रवारी (03 नोव्हेंबर) आपला 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. या लेखातून आपण हिमांशच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया…

अवघ्या तीन महिन्यात सोडली होती आरजेची नोकरी
हिमांशचा जन्म 3 नोव्हेंबर, 1989रोजी दिल्ली येथे झाला होता. अनेक अभिनेत्यांप्रमाणे हिमांशही लहानपणापासूनच बॉलिवूडचे ‘पहिले सुपरस्टार’ राजेश खन्ना यांचा मोठा चाहता आहे. त्यांचे चित्रपट अभिनेत्याला खूप आवडतात. तो त्यांना आपला आदर्श मानतो. हिमांशने आपले शिक्षण दिल्ली येथूनच पूर्ण केले होते. विशेष म्हणजे, त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात रेडिओ जॉकी म्हणून केली होती. मात्र, त्याची ओढ अभिनयाकडेच होती. त्यामुळे अवघ्या तीन महिन्यात त्याने आपली आरजेची नोकरी सोडली होती. (Happy Birthday Actor Himansh Kohli Worked As RJ And for First Film He Leave TV Show)

नेहा आणि हिमांश आले होते एकमेकांच्या जवळ
सन 2011 मध्ये हिमांशने टीव्ही शो ‘हम से है लाईफ’मधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. या शोमध्ये त्याच्या पात्राचे नाव राघव ओबेरॉय होते. शोमध्ये काम करतानाच त्याच्या झोळीत एक चित्रपट पडला होता. त्या चित्रपटाचे नाव ‘यारियां’ असे आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेत्री- दिग्दर्शक दिव्या खोसला कुमारने केले होते. हा चित्रपट सन 2014 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील हिमांशच्या कामाचे प्रेक्षकांकडून कौतुक करण्यात आले होते. चित्रपटातील सर्व गाणी हिट झाली होती. त्यातील एक म्हणजे, ‘आज ब्लू है पानी… पानी… पानी…’ होय. हे गाणे गायिका नेहा कक्कर आणि रॅपर हनी सिंग यांनी गायले होते. माध्यमांतील वृत्तांनुसार, याच चित्रपटातून हिमांश आणि नेहा एकमेकांच्या जवळ आले होते.

हिमांश एकेकाळी नेहावर जीवापाड प्रेम करायचा. एकदा तो ‘इंडियन आयडल 10’च्या सेटवर नेहाला सरप्राईज देण्यासाठी पोहोचला होता. शोदरम्यान दोघांनीही आपले प्रेम स्वीकारले होते. दोघे तब्बल 4 वर्षे नात्यात होते. अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती की, दोघेही लवकरच लग्न करतील. मात्र, अचानक ब्रेकअपच्या वृत्तांनी दोघांचेही चाहते नाराज झाले होते.

‘या’ चित्रपटांमध्ये केले होते काम
दरम्यान, सन 2017 मध्ये हिमांशचे तीन चित्रपट ‘स्वीटी वेड्स एनआरआय’, ‘रांची एक्सप्रेस’ आणि ‘दिल जो न कह सके’ हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. मात्र, हे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल फ्लॉप ठरले होते. सन 2018मध्ये त्याचा आणखी एक ‘अभी नहीं तो कभी नहीं’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र, हा देखील खास कामगिरी करू शकला नाही.

हिमांश कोहलीने चित्रपटांव्यतिरिक्त अनेक म्युझिक व्हिडिओमध्येही काम केले आहे. त्याचा पहिला अल्बम सन 2018 मध्ये आला होता. यामध्ये गायिका नेहा कक्कर आणि तिचा भाऊ टोनी कक्करनेही आपला आवाज दिला होता.

यावर्षी आतापर्यंत हिमांश 5 म्युझिक व्हिडिओमध्ये दिसला आहे. हे सर्व म्युझिक व्हिडिओ टी- सीरिजचे अल्बम आहेत.

हिमांश कोहलीला दैनिक बोंबाबोंबकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!!!

हेही नक्की वाचा-
मोठी बातमी! बोल्ड ड्रेस घातल्यामुळे मुंबई पोलिसांकडून उर्फी जावेदला अटक
मृणालने शेअर केला परेश रावलसोबत काम करण्याचा अनुभव; म्हणाली, भविष्यातही कॉमेडी चित्रपट करायला आवडेल’

हे देखील वाचा