Friday, July 5, 2024

अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण

सिनेसृष्टीला आजवर अनेक दिग्गज कलाकार मंडळी लाभली आहेत. यातीलच ७० ते ८०च्या दशकात बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारे, प्रतिभावान अभिनेते अमिताभ बच्चन सोमवारी ( ११ ऑक्टोबर) त्यांचा वाढदिवस साजरा करतात.

सुरुवातीला चित्रपटात पदार्पण केल्यावर कोणत्याच अभिनेत्रीला त्यांच्या उंचीमुळे मुख्य अभिनेता म्हणून त्यांच्याबोबर काम करावे वाटत नव्हते. परंतु या सर्व गोष्टींना मोठ्या धीराने सामोरे जात बिग बींनी इतिहास रचला. त्यांच्या अभिनयाची जादू जेव्हापासून सुरू झाली, तेव्हा पासूनच त्यांनी बॉलिवूड गाजवण्याचा विडाच उचलला. आपल्या अभिनयाने त्यांनी ८० च्या दशकापर्यंत स्वतःचा दबदबा निर्माण केला होता. त्यांच्या एन्ट्रीने आख्खं थेटर शिट्ट्यांच्या आणि टाळ्यांच्या आवाजाने दणानून जायचं. त्यांच्या ‘डॉन को पकडना मुश्कील ही नही नामुमकीन है’ या डायलॉगने त्या काळी कोट्यावधी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते.

त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये ‘सत हिंदुस्तानी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी ‘जंजीर’, ‘अभिमान’, ‘सौदागर’, ‘चुपके चुपके’, ‘दीवार’, ‘शोले’, ‘कभी कभी’, ‘अमर अकबर एंथनी’, ‘त्रिशूल’, ‘डॉन’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘मि. नटवरलाल’, ‘लावारिस’, ‘सिलसिला’, ‘कालिया’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘नमक हलाल’, ‘शक्ति’, ‘कुली’, ‘शराबी’, ‘मर्द’, ‘शहंशाह’, ‘अग्निपथ’, ‘खुदा गवाह’, ‘मोहब्बतें’, ‘बागबान’, ‘वक्त’, ‘सरकार’, ‘चीनी कम’, ‘भूतनाथ’, ‘पा,’ ‘सत्याग्रह’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

अमिताभ नाही तर ‘हे’ होते पाहिले नाव
बहुआयामी बिग बींचा जन्म ११ ऑक्टोबर १९४२ रोजी अलाहाबादमध्ये झाला. त्यांचे वडील महान कवी हरिवंश राय बच्चन आणि आई तेजी बच्चन या होत्या. अमिताभ यांचा जन्म झाला तेव्हा भारत छोडो हे आंदोलनं सुरू होते. त्यामुळे त्यांचे नाव इंकिलाब ठेवण्यात आले हते. पुढे कालांतराने त्यांचे नाव बदलून अमिताभ असे ठेवण्यात आले.

या कारणासाठी रेखाला सोडले
बिग बी आणि रेखा यांची प्रेम कहाणी आख्या जगाला माहित आहे. ‘दो अंजना’ या चित्रपटामध्ये हे दोघे पहिल्यांदा भेटले होते. विशेष म्हणजे रेखा यांचा वाढदिवस १० ऑक्टोबरला आणि अमिताभ यांचा वाढदिवस ११ ऑक्टोबरला असतो. रेखा यांनी कायमच त्याचे प्रेम माध्यमांसमोर व्यक्त केले. परंतु बिग बी यांनी कायमच याविषयी बोलणे टाळले. ‘सिलसिला’ या चित्रपटामध्ये जया बच्चन, अमिताभ बच्चन आणि रेखा यांनी भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाची कहाणी या तिघांच्या आयुष्याशी अगदी जुळती मिळती आहे. रेखा यांना अमिताभ यांच्या बरोबर लग्न करायचे होते. परंतु आधीच विवाहित असल्याने बिग बींनी नकार दिला. त्यानंतर हे दोघे वेगळे झाले.

राकेश रोशन यांच्या बरोबर कधीच केले नाही काम
चित्रपट ‘किंग अंकल’ मध्ये राकेश रोशन यांनी बिग बींची निवड केली होती. चित्रपटाची सर्व तयारी झाली होती. शूटिंग सुरू होणार तेवढ्यात बिग बी यांनी काम करण्यास नकार दिला. याचा राकेश यांना खूप राग आला होता. बिग बींनी त्यांना काही काळानंतर त्यांच्या खासगी कामामुळे चित्रपटात काम करता आले नाही असे सांगितले. त्यामुळे तेव्हा पासून आजपर्यंत हे दोघेही एकत्र काम करताना कधीच दिसले नाही.

राजकारणातही घेतली होती उडी
अमिताभ बच्चन यांनी चित्रपटांतील यश मिळवल्यानंतर राजकारणात देखील आपल्या नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला होता. अलाहाबाद लोकसभा निवडणुकीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एच एन बहुगुणा यांना हरवले होते. परंतु राजकारणात ते फार काळ टिकले नाही.

सध्या बिग बी ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचे सूत्रसंचालन करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शहनाझ गिलचा चेहरा पाहून चाहत्यांना जाणवली उदासीनता, व्हिडिओ पाहून करतायत विचारपूस

-‘मी माझ्या हृदयाच्या जवळ ठेवते’, म्हणत सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या नात्याबद्दल बोलली कियारा\

-जॅकलिन फर्नांडिसचे ब्लॅक ब्रालेट, शिमरी जॅकेटमधील बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल

हे देखील वाचा