बॉलिवूडमध्ये किंवा संपूर्णच मनोरंजनविश्वात पाहिले तर लक्षात येते की, इथे काम मिळ्वण्यासाटःई येणार प्रत्येक व्यक्ती यशस्वी होतो असे नाही. काहींना अपयशाचा सामना करत पुन्हा फिरावे लागते. मात्र असे देखील काही कलाकार आहेत, ज्यांना यश तर नाही मिळत पण त्यांचे नाव भरपूर होते, आणि ते तगडी फॅन फॉलोविंग तयार करतात. असे कलाकार मुख्य भूमिका साकारतात असे नाही, ते साईड भूमिका करूनही ओळख मिळवतात अशी एक अभिनेत्री आणि मॉडेल म्हणजे अंजना सुखानी. ‘सलाम-ए-इश्क’ फेम अंजना जरी बॉलिवूडमध्ये मोठे यश मिळवू शकली नसली तरी तिची लोकप्रियता भरपूर आहे, आणि मधेमधे ती चित्रपटांमध्ये दिसतही असते. ‘सलाम-ए-इश्क’ सिनेमात अनिल कपूर जिच्या प्रेमात वेडा होतो त्या अंजना सुखानीचा आज (१० डिसेंबर) ४३ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने जाणून घेऊया तिच्याबद्दल अधिक माहिती.
अंजनाचा जन्म १० डिसेंबर १९७८ रोजी जयपूर येथे झाला. अंजनाने तिचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर या गळ्मार इंडस्ट्रीमध्ये करिअर करण्याचे ठरवले. या क्षेत्रात आल्यानंतर तिने करिअरच्या सुरुवातीच्या काळात अनेक टीव्ही जाहिरातींमध्ये काम केले. अंजनाने पहिल्यांदा अमिताभ बच्चन यांच्यासोबत कॅडबरी चॉकलेटच्या जाहिरातीत काम केले. पहिलीच जाहिरात आणि तीही सुपरस्टार अमिताभ यांच्यासोबत ही गोष्टच तिला सुखावून गेली. कॅडबरीची ही जाहिरात खूप गाजली आणि या जाहिरातीतून तिला ओळख मिळाली.
पुढे अंजनाने २००५ साली ‘हम दम’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याचवर्षी तिने तेलगू ‘ना ओप्परी’ सिनेमातून तेलगी चित्रपटांमध्ये देखील एन्ट्री मारली. ती ‘घर जायेगी’ या म्युझिक व्हिडिओमध्ये सुद्धा झळकली. या गाण्याने अंजनाला नवी ओळख मिळवून दिली. अंजनाने गोलमाल रिटर्न, जय वीरू, जश्न, संडे, दे ताली, अल्लाह के बंदे, साहेब बीबी गँगस्टर आदी अनेक चित्रपटांमध्ये ती झळकली आहे. हिंदीसोबतच अंजनाने तेलगू, तामिळ, कन्नडा, पंजाबी, मराठी, आदी अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले.
अंजनाने २०१६ साली संजय लीला भन्साळी यांची निर्मिती असणाऱ्या ‘लाल इश्क’ या सिनेमात काम केले. या सिनेमात तिने स्वप्नील जोशीसोबत काम करत मराठी चित्रपटांमध्ये पदार्पण केले. मधल्या काळात अंजना जवळपास दोन वर्ष नैराश्यात होती. अंजनाच्या मावशीचे कर्करोगाने निधन झाले. त्यानंतर तिच्या आजीचेही निधन झाल्याने ती तिच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकली नाही.
अंजनाने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, ‘माझ्या मावशीचे लग्न झाले नव्हते, त्यामुळे मी नेहमी तिच्यासोबत हॉस्पिटलमध्ये राहायचे. तिचा त्रास मला अजिबात भागवत नव्हता तिला खूप त्रास झाला.’ तिने तिच्या भावाला सांगिल्यावर त्याने तिला डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला, आणि ४/५ महिने उपचार घेतल्यानंतर ती हळूहळू यातून बाहेर पडू लागली. यासाठी तिने २ वर्ष चित्रपटांमधून ब्रेक घेतला. पूर्ण बरे झाल्यानंतर ती अक्षय कुमारच्या ‘गुड न्यूज’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर परतली. नंतर ती जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मीसोबत ‘मुंबई सागा’ चित्रपटात दिसली होती.
अधिक वाचा –










