Monday, September 25, 2023

वयाच्या चौथ्या वर्षी केली होती सुनिधीने गाण्यास सुरुवात; धड 1 वर्षही नाही टिकले लग्न, मग…

बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चौहानने सोमवारी (14 ऑगस्ट) 40व्या वयात पदार्पण केले. सुनिधीचा जन्म 14 ऑगस्ट, 1983 रोजी दिल्ली मध्ये झाला होता. वयाच्या 11व्या वर्षापासून सुनिधी आपल्या सुमधूर सुरांनी प्रेक्षकांची मने जिंकत आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त संगीत क्षेत्रातील तिचा आतापर्यंतचा प्रवास जाणून घेऊयात.

सुनिधीला संगीताची आवड तशी बालपणापासूनच. सुनिधी 4 वर्षांची असल्यापासून मंदिरांमध्ये गात होती. तिची संगीतातील आवड हळूहळू यशाचे शिखर गाठू लागली. वयाच्या 11 व्या वर्षी डीडी वन या टीव्ही चॅनेलवरील ‘टॅलेंट हंट’ या कार्यक्रमात तिने सहभाग घेतला होता. या कार्यक्रमापासूनच संगीतातील सुनिधीचा खरा प्रवास सुरू झाला. या कार्यक्रमात तिने विजय मिळवला आणि लता मंगेशकर यांच्या हस्ते सुनिधीला पारितोषिक देण्यात आले. (Happy Birthday Singer Sunidhi Chauhan Know About Her)

त्यानंतर वयाच्या 16व्या वर्षी सुनिधीला चित्रपट निर्माते रामगोपाल वर्मा यांनी त्यांच्या ‘मस्त’ या चित्रपटात गाण्याची संधी दिली. या संधीचे सोने करत तिने गायलेल्या या चित्रपटातील सर्वच गाण्यांना चाहत्यांची चांगलीच पसंती मिळाली.

या सर्व प्रवासात सूनिधी लग्नबंधनामध्ये अडकली. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण सुनिधीने आपल्यापेक्षा १४ वर्ष वयाने मोठ्या व्यक्तीबरोबर लग्न केले. वयाच्या 18व्या वर्षी सुनिधीने आपल्या घरच्यांच्या विरोधात जाऊन दिग्दर्शक बॉबी खान यांच्याशी लग्न केले. परंतु तिला तिची चूक लक्षात आली आणि एका वर्षाच्या आतच त्या दोघांचा घटस्पोट झाला.

या सर्व प्रसंगातून सुनिधीने स्वतःला कसे बसे सावरले व पुन्हा आपल्या संगीतावर लक्ष केंद्रित केले. त्यानंतर 9 वर्षांनी तिने म्युझिक कंपोजर हितेश सोनिक यांच्याशी विवाह केला. हितेश व सुनिधी 15 वर्षांपासून एकमेकांना चांगले ओळखत होते व ते दोघे बालपणीचे चांगले मित्रही होते. सध्या दोघेही सुखी आयुष्य जगत आहेत.

सुनिधीच्या संगीताबद्दल बोलायचे झाले, तर तिने आतापर्यंत ‘रुकी रुकी’, ‘डांस पे चांस’, ‘कमली’, शीला की जवानी’, ‘इश्क सुफियाना’, ‘बीड़ी जलयले’, ‘देसी गर्ल’, ‘भागे रे मन’ अशी अनेक हिट गाणी बॉलिवूडला दिली आहेत. इतकंच नाही, तर सुनिधीने मराठी, कन्नड़, तेलुगू, तमिळ, पंजाबी, बंगाली, आसामी, नेपाळी आणि उर्दू या भाषांमध्येही गाणी गायली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-
आपल्या आवाजाने जादू करणाऱ्या सुनिधी चौहानचा असा आहे प्रवास, ‘या’ गाण्यांनी लावले होते प्रेक्षकांना वेड
जेव्हा वैजयंती मालासोबत असलेल्या प्रेमसंबंधाची भनक लागली होती राज कपूर यांच्या पत्नीला, तेव्हा साडे चार महिने…

हे देखील वाचा