Tuesday, July 9, 2024

Birthday Special: लग्नाच्या ८ वर्षांनंतर आई बनली होती गुल पनाग, सहा महिने जगापासून लपवले बाळ

बॉलिवूड ते राजकारण असा प्रवास करणारी गुल पनाग (Gul Panag) आज तिचा ४३वा वाढदिवस साजरा करत आहे. गुल पनागचा जन्म ३ जानेवारी १९७९ रोजी चंदिगडमध्ये झाला. तिचे खरे नाव गुलकीरत कौर पनाग आहे. ती एक पायलट, फॉर्म्युला कार रेसर, भारतीय चित्रपट अभिनेत्री, व्हीओ आर्टिस्ट आणि राजकारणी आहे.

गुल पनागने २०११मध्ये तिचा बालपणीचा मित्र पायलट ऋषी अटारीशी लग्न केले होते. हा विवाह चंदिगडच्या गुरुद्वारामध्ये झाला होता, ज्याची खूप चर्चा झाली. कारण नवरीची विदाई बुलेटवर झाली होती. त्यांना निहाल हा एक मुलगाही आहे. गुल वयाच्या ३९व्या वर्षी आई झाली, पण तिने सहा महिने मुलाला जगापासून लपवून ठेवले होते. (happy birthday gul panag not only actress but she is pilot)

गुल पनागने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. त्यानंतर तिने मिस फेमिना मिस इंडियामध्ये भाग घेतला. तिने १९९९मध्ये मिस इंडिया आणि मिस ब्युटीफुलचा किताब पटकावला होता. त्यानंतर ती मिस युनिव्हर्समध्येही सहभागी झाली होती, मात्र ती जास्त पुढे जाऊ शकली नाही. गुल पनागने तिच्या सुंदर हास्यासाठी मिस ब्युटीफुल स्माइलचा किताबही पटकावला आहे.

गुल पनागने २००३ मध्ये ‘धूम’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर तिने एकामागून एक ‘जुर्म’, ‘डोर’, ‘नोरमाँ सिक्स फीट अंडर’, ‘हॅलो’, ‘स्ट्रेट’ आणि ‘रण’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले. २००८ मध्ये गुल पनाग तिच्या मॅक्सिम मॅगझिनसाठी केलेल्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आली होती. हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त तिने पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे.

गुल पनागने राजकारणातही नशीब आजमावले आहे. २०१४मध्ये पनागने आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने तिला चंदीगडमधून उमेदवार म्हणून घोषित केले. इथे तिची स्पर्धा भाजपच्या किरण खेर आणि काँग्रेसचे पवन बन्सल यांच्याशी होती. मात्र या निवडणुकीत तिची निराशा झाली, कारण ती निवडणूक हरली. तेव्हापासून गुल पनाग राजकीय जगातून जवळपास गायबच आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा