Sunday, June 8, 2025
Home कॅलेंडर सिनेमापेक्षा कमी नाहीये कबीर बेदींचे आयुष्य, ३ लग्नांनंतर ७० व्या वर्षी थाटला चौथ्यांदा संसार

सिनेमापेक्षा कमी नाहीये कबीर बेदींचे आयुष्य, ३ लग्नांनंतर ७० व्या वर्षी थाटला चौथ्यांदा संसार

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेते होऊन गेले आणि आहेत, ज्यांनी आपल्या खनलायकी अभिनयाने पडद्यावर आपले पात्र जिवंत केले. खूप कमी कलाकार खलनायक म्हणून लोकप्रिय होतात. त्यातीलच एक म्हणजे कबीर बेदी. कबीर यांनी हिंदी सिनेसृष्टीसोबतच आपल्या अभिनयाचा डंका हॉलिवूडमध्येही गाजवलाय. कबीर रविवारी (१६ जानेवारी) आपला ७६ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी. चला तर सुरुवात करूया…

कबीर बेदी (Kabir Bedi) यांचा जन्म १६ जानेवारी, १९४६ रोजी लाहोर येथे शीख कुटुंबात झाला आहे. त्यांचे वडील बाबा प्यारे लालसिंग बेदी हे एक पंजाबी लेखक आणि वाचक होते, तर त्यांची आई फ्रेडी बेदी एक ब्रिटीश महिला होती. त्यांचा जन्म इंग्लडमधील डर्बीमध्ये झाला होता. कबीर यांच शिक्षण नैनीताल, उत्तराखंडमधील शेरवूड कॉलेजमध्ये आणि स्टीफन कॉलेजमधून झाले, तर पदवी दिल्लीमधून घेतली.

कबीर बेदी हे संपूर्ण सिनेसृष्टीला परिचित असलेले नाव. ते एक उत्तम कलाकार आहेत. आपल्या भारदस्त आवाजासाठी ते विशेष प्रसिद्ध आहेत. तुम्हाला माहिती नसेल पण कबीर खान फक्त भारतातच नव्हे, तर अमेरिका आणि इटलीमध्येही काम करत असतात. कबीर यांंना बॉलिवूडमध्ये खलनायकाची भूमिका करणारे अभिनेते म्हणून ओळखले जाते. त्यांनी अनेक चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे. ज्यामध्ये ‘खून बरी मांग’, ‘मोहनजोदाडो’, ‘साहब बिवी और गँगस्टर रिटर्न’ या चित्रपटांचा समावेश आहे.

त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल बोलायच झाले, तर कबीर यांनी तीन लग्न केली होती. ज्यांच्यापासून त्यांना पूजा, सिद्धार्थ आणि एडम अशी तीन मुले आहेत. त्यांचं पहिलं लग्न प्रोतिमा नावाच्या एका ओडिशी डान्सरसोबत झालं होतं. जिच्यापासून त्यांना पूजा नावाची मुलगी आहे. पूजा ही अभिनेत्री आणि एक स्तंभलेखिका आहे. त्यांचा दूसरा मुलगा सिद्धार्थ अमेरिकेत कार्नेगी मेलॉन विद्यापिठात शिक्षणासाठी गेला होता. तिथे त्याला स्किजोफ्रेनिया नावाच्या महाभयंकर रोगाने ग्रासल ज्यामुळे त्याने आत्महत्या केली.

१५ वर्षांनंतर तुटले तिसरे लग्न
प्रोतिमाचे आणि कबीर बेदी यांचे नाते बॉलिवूड अभिनेत्री परवीन बाबीमुळे खराब झाल्याचे बोलले जाते. त्यानंतर त्यांनी ब्रिटिश फॅशन डिझायनर सुझेन हम्फ्रेससोबत लग्न केले. त्यांना एक मुलगाही आहे. मात्र, हे लग्नही जास्त काळ टिकलं नाही आणि त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर कबीर यांनी १९९० मध्ये टीव्ही प्रेझेंटर निक्की बेदीसोबत तिसरे लग्न केले. हे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. १५ वर्षांचे हे नाते २००५ तुटले. ज्यानंतर कबीर यांनी परवीन दोसांझला डेट करायला सुरुवात केली.

हेही पाहा- मराठी सिनेसृष्टीतील ‘या’ कलाकारांनी दोनदा केलंय लग्न

७० व्या वाढदिवशी केले चौथे लग्न
कबीर बेदी यांनी त्यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी गर्लफ्रेंड परवीन दोसांझशी लग्न केले. हे त्यांचे चौथे लग्न होते. परवीन ही एक ब्रिटिश वंशाची अभिनेत्री, मॉडेल आणि चित्रपट निर्माती आहे, जी जवळजवळ दहा वर्षे कबीरसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती.

हेही वाचा-

हे देखील वाचा