Monday, February 24, 2025
Home अन्य ‘ये रिश्ता क्या कहलाता है’चा नैतिक करतोय त्याचा वाढदिवस साजरा, जाणून घ्या संपूर्ण कारकीर्दप्रवास

‘ये रिश्ता क्या कहलाता है’चा नैतिक करतोय त्याचा वाढदिवस साजरा, जाणून घ्या संपूर्ण कारकीर्दप्रवास

टीव्हीच्या लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक करण मेहरा हा एक अभिनेता आहे. करण मेहराने आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. करण शुक्रवारी (१० सप्टेंबर) आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म १० सप्टेंबर १९८२ रोजी जालंधर, पंजाब येथे झाला. तो मोठा झाल्यावर त्याचे कुटुंब दिल्लीला शिफ्ट झाले. त्याने एनआयएफटी दिल्ली येथून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले. अभ्यासानंतर त्याने डॉमिनोज पिझ्झामध्ये प्रशिक्षणार्थी म्हणूनही काम केले. करण मेहराने टीव्हीमध्ये येण्यापूर्वी मॉडेलिंग आणि फॅशन डिझायनिंगही केले आहे.

जेव्हा करण मुंबईत आला तेव्हा त्याने दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि राम गोपाल वर्मा यांचे सहाय्यक म्हणून काम केले. या दोन चित्रपट निर्मात्यांसोबत त्याने एकूण ४ चित्रपट केले. यानंतर त्याने २००८ च्या ‘लव्ह स्टोरी २०५०’ या चित्रपटात काम केले. यानंतर, जेव्हा तो अभिनयाचे क्लासेस घेत होता, तेव्हा त्याला ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये ‘नैतिक सिंघानिया’ची भूमिका करण्याची संधी मिळाली. या शोमधून त्याला मोठा ब्रेक मिळाला. त्याने सात वर्षांहून अधिक काळ या शोमध्ये काम केले. नंतर प्रकृती खराब झाल्यामुळे पुढे त्याने हा शो सोडला.

करण मेहरा २०१२-१३ दरम्यान पत्नी निशा रावलसोबत ‘नच बलिये ५’ आणि ‘नच बलिये श्रीमान विरुद्ध श्रीमती’ मध्ये सहभागी झाला होता. २०१६ मध्ये त्याने ‘बिग बॉस १०’ मध्ये भाग घेतला. ऑक्टोबर २०२० मध्ये त्याने पंजाबी टीव्ही शो ‘मावां थंडिया छावां’ मध्ये काम करण्यास सुरुवात केली. यानंतर तो गायक जुबीन नौटियाल आणि रोचक कोहली यांच्या ‘बेवफा तेरा मासूम चेहरा’ या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसला.

करण मेहराने २४ नोव्हेंबर २०१२ रोजी निशा रावलशी लग्न केले. लग्नाआधी दोघांनी एकमेकांना जवळजवळ ६ वर्षे डेट केले होते. करण मेहरा जेव्हा ‘बिग बॉस’ मध्ये होता तेव्हा निशा गर्भवती होती. २०१७ मध्ये त्यांनी मुलगा कविशला जन्म दिला. दोघांना ही पालकत्वाचा पूर्ण आनंद घेता आला नाही. मागच्या वर्षीपासून दोघांमध्ये सतत वाद सुरू होते. लग्नाच्या इतक्या वर्षानंतर दोघांचा घटस्फोट झाला आणि आता ते वेगळे झाले आहेत.

निशा रावलने करण मेहरावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. एवढेच नाही तर निशाने करण मेहरावर तिच्या लग्नाचे दागिने आणि इतर आवश्यक वस्तू ठेवल्याचा आरोप ही केला होता. निशाने असेही म्हटले होते की, “तिला करणकडून पोटगी नको आहे. ती तिच्या मुलाची काळजी घेऊ शकते.” त्याचवेळी, करण मेहराने नुकताच मुलाचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आणि त्याने सांगितले की, “तो १०० दिवसांपेक्षा जास्त काळ आपल्या मुलाला भेटला नाही.” करण आपल्या मुलाला भेटण्यासाठी हतबल झाला आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या सेटवर एन्जॉय करताना दिसले ‘ही मॅन’; चहा पित म्हणाले, ‘चीयर्स!’

-‘मी विराट कोहलीच्या प्रेमात वेडी झाले होते’, म्हणत ऋतिक रोशनच्या ‘या’ अभिनेत्रीने केला खुलासा

-रवी तेजा ईडीच्या कार्यालयात हजर, मनी लॉन्ड्रिंगसह ‘या’ प्रकरणीही करण्यात आली चौकशी

हे देखील वाचा