Sunday, June 16, 2024

हॅप्पी बड्डे भावा! ‘फुकरे’चा चूचा असो वा ‘छिछोरे’चा सेक्सा; प्रत्येक भूमिकेत वरुणने जिंकली चाहत्यांची मने

‘फुकरे’ या सुपरहिट चित्रपटाने फिल्मी जगात प्रवेश करणार्‍या वरुण शर्माचा आज आपला 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने ‘फुकरे’, ‘छिचोरे’ या चित्रपटांद्वारे प्रेक्षकांच्या मनात आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. तसेच, वरुण अभिनेत्री क्रिती सेननचा अगदी जवळचा मित्र आहे.

कॉमेडीसाठी प्रसिद्ध असलेला बॉलिवूड अभिनेता वरुण शर्माचा जन्म 4 फेब्रुवारी रोजी पंजाबच्या जालंधरमध्ये झाला होता. वरुणने आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात ‘फुकरे’ या चित्रपटाद्वारे केली. बॉलिवूड चित्रपटांमध्ये सह-अभिनेता आणि विनोदी कलाकाराची भूमिका साकारणार्‍या वरुण शर्माने सर्वांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे. ‘फुकरे’चा चूचा असो नाही तर ‘छिचोरे’चा सेक्सा, त्याने प्रत्येक पात्र आपल्या अभिनयाने जिवंत केले आहे. ‘फुकरे’ मधील कॉमिक रोलमुळे त्याचे समीक्षकांनी बरेच कौतुक देखील केले.

वरुणने ‘फुकरे’, ‘छिछोरे’ व्यतिरिक्त ‘रब्बा मैं क्या करु’, ‘डॉली की डोली’, ‘वॉर्निंग’ सारख्या बऱ्याच चित्रपटातून प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन केले आहे. कॉमेडी तर वरुणच्या नसानसांत आहे, त्यामुळे वरुण बॉलीवूडचा नवा कॉमेडियन आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

वरुणचे बालपण जालंधरमध्ये गेले. त्याच्या घरातील कोणत्याच सदस्याचा अभिनयाच्या जगाशी संबंध नव्हता. वरुणने सुरुवातीचे शिक्षण लॉरेन्स स्कूलमधून पूर्ण केले. नंतर त्याने एपीजे स्कूलमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.

मनोरंजन व चित्रपट तंत्रज्ञानात पदवीधर असलेल्या वरुण शर्माला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पंजाब गव्हर्नरद्वारे आयकॉन पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

वरुणच्या कुटुंबाबद्दल बोलायचे झाले, तर वरुण आपल्या आई आणि बहिणीच्या खूप जवळ आहे. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत वरुणने सांगितले होते की, ‘क्रिती सेनन माझी सर्वात जवळची मैत्रीण आहे. मी आणि ती भाऊ-बहिणीसारखे नसून भाऊ-भाऊ बनून राहतो. मी पण तिला भाऊ म्हणूनच बोलतो. माझे भाग्य आहे की, क्रितीमुळे मला बहीण आणि मैत्रीण मिळाली. तिला माझे सगळे रहस्य माहित आहे.’

https://www.instagram.com/p/CAAY-AghZhF/?utm_source=ig_web_copy_link

वास्तविक, चित्रपटाच्या सेटवर कलाकारांचा बराच वेळ घालवला जातो आणि त्यामुळे त्यांचे एकमेकांशी चांगले नाते बनते. वरुण शर्मा आणि क्रिती सेनन यांनी ‘दिलवाले’ आणि ‘राबता’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या व्यतिरिक्त त्यांनी ‘अर्जुन पटियाला’ या विनोदी चित्रपटात देखील सोबत काम केले आहे.

हेही वाचा-

वाढदिवस विशेष! ‘कथ्थक’ नृत्यामधील मेरुमणी म्हणजेच पंडित बिरजू महाराज; वाचा त्यांच्या जीवनातील काही खास गोष्टी

जय-वीरुची जोडी! वाढदिवसाचे औचित्य साधून भरत जाधने शेअर केला अंकुशबरोबरचा ‘तो’ जुना फोटो

हे देखील वाचा