थ्री एडियट्स चित्रपटात काम केलेली ‘ती’ अभिनेत्री सध्या झालीय गायब, सोशल मीडियावर दिसत नाहीत पोस्ट

happy birthday komal jha south indian actress komal jha bold and glamourous photos will make you fall in love with her bhojpuri south ashas


चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्यात क्षमता खूप आहे, पण त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार यश मिळत नाही. अशीच एक कलाकार म्हणजे अभिनेत्री कोमल झा. महेंद्रसिंग धोनीच्या रांची शहरात जन्मलेली कोमल झा आज (15 मार्च) तिचा वाढदिवस साजरा करीत आहेत.

कोमलने 2000 मध्ये आमिर खानच्या ‘3 इडियट्स’ या चित्रपटाद्वारे तिच्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात केली होती. त्यावेळी या चित्रपटात कोमल अभिनेत्री नव्हती, ती चित्रपटाच्या गाण्यात विद्यार्थीनी बनली होती. हा रोल खूपच छोटा होता.

कोमलचा पहिला मल्याळम चित्रपट ’24 hrs’ हा 2010 मध्ये प्रदर्शित झाला होता. आदित्य सॅम अब्राहम दिग्दर्शित हा अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट होता. त्यानंतर, तिला दुबईतील एका बांधकाम कंपनीत नोकरी मिळाली. पण परत तिला कन्नड आणि तेलगू चित्रपटात काम करण्याच्या ऑफर येऊ लागल्या, ज्यामुळे ती चित्रपट सृष्टीत परतली.

कोमलने तेलगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. खूप कमी लोकांना माहीत आहे की, कोमल ही एक इंजिनीअर होती आणि ती नोकरी सोडून चित्रपटांत नाव कमवायला आली होती.

सन 2013 मध्ये आलेल्या ‘प्रियतमा नीवाचता कुशालामा’ या चित्रपटातील तिच्या को-स्टार वरुण संदेशवर तिने गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. यामुळे कोमलचे नाव तेव्हा वादविवादांमध्ये आले. यानंतर तिचा फोटो चित्रपटाच्या पोस्टरवरून काढला गेला होता.

पुढे साल 2018 मध्ये, कोमल झा ‘गीत इश्क दा’ या पंजाबी गाण्यात अभिनेत्रीच्या भूमिकेतही दिसली होती. ज्यात तिच्या लूकचे जोरदार कौतुक झाले.

कोमलला इन्स्टाग्रामवर 1 दशलक्षहून अधिक लोक फॉलोव करतात. सोशल मीडियावर ती अनेकदा स्वत: चे बोल्ड फोटो शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर तिचे 3181 पोस्ट आहेत, पण आश्चर्याची बाब म्हणजे जून 2020 पासून कोमलने सोशल मीडियावर एकही पोस्ट शेअर केली नाही. या मागील कारणही समोर आले नाही. आता मात्र तिचे चाहते तिला नक्कीच मिस करत असतील.


Leave A Reply

Your email address will not be published.