Tuesday, July 1, 2025
Home बॉलीवूड इंजिनियरिंगचा अभ्यास करणारी क्रिती सेनन कशी बनली बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री? वाचा तिचा सिनेप्रवास

इंजिनियरिंगचा अभ्यास करणारी क्रिती सेनन कशी बनली बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री? वाचा तिचा सिनेप्रवास

नेहमीच म्हटले जाते की अभिनयाच्या या ग्लॅमरस जगात एन्ट्री मिळवणे, स्वतःला सिद्ध करणे आणि मुख्य म्हणजे इथे टिकणे खूपच अवघड काम असते. मात्र अनेक लोक या क्षेत्रात कोणताही पाठिंबा नसताना, केवळ स्वतःवर आणि त्यांच्यात असणाऱ्या प्रतिभेवर विश्वास ठेवत येतात. नक्कीच इथे लक देखील खूप मोठी भूमिका निभावत असते. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, जे केवळ त्यांच्या प्रभावी अभिनयाच्या जोरावर आज मोठा पडदा गाजवत आहे. ब्युटी विथ ब्रेन या भागात येणाऱ्या खूप कमी अभिनेत्री या क्षेत्रात आहे. अशीच एक अभिनेत्री म्हणजे क्रिती सेनन. सौंदर्य, प्रतिभा आणि हुशारी असा तिहेरी संगम असलेली क्रिती आज तिचा ३२ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याबद्दल अधिक माहिती.

क्रितीचा जन्म २७ जुलै १९९० रोजी दिल्लीमध्ये झाला. तिचे वडील चार्टर्ड अकाऊंटंट तर आई प्राध्यापिका आहे. तिने न्यू दिल्ली पब्लिक स्कूल आरके पुरम शाळेतून तिचे शिक्षण पूर्ण केले. क्रितीने इलेक्ट्रॉनिक्स ऍंड कम्युनिकेशनमध्ये बी. टेक केले. कृतीला सुरुवातीपासूनच अभिनयाचे खूप वेड होते. वयाच्या पाचव्या वर्षी क्रितीने मधू सप्रे आणि मिलिंद सोमण यांच्यासोबत रॅम्प वॉक केले होते. मॉडेलिंग करणे हा तिचा फक्त छंद होता. मात्र तिला करिअर अभिनयातच करायचे होते. (happy birthday kriti sanon unknown facts)

सुरुवातीच्या काळात कृतीने अभिनयात येण्यापूर्वी मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये काम केले. विवेल सोप, क्लोज अप, अमुल आईस्क्रिम आदी अनेक ब्रॅंडच्या जाहिरातींमध्ये ती दिसली. जाहिरातींमध्ये काम करत असतानाच दुसरीकडे तिचे अभिनयात येण्यासाठी प्रयत्न देखील चालू होते. या प्रयत्नातच तिला तिचा पहिला दाक्षिणात्य सिनेमा मिळाला. तिने तिच्या अभिनयाची सुरुवात ‘नेनोक्काडाइन’ या तेलगू सिनेमातून महेश बाबुसोबत केली. या साइकोलॉजिकल थ्रिलर सिनेमाला सरासरी प्रतिसाद मिळाला. मात्र क्रितीच्या अभिनयाचे समीक्षकांनी चांगले कौतुक केले.

या चित्रपटातून तिने साऊथ इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री तर केली, मात्र तिचे खरे लक्ष्य होते बॉलिवूड. इकडे सिनेमे मिळवण्यासाठी तिची चांगलीच धडपड चालू होती. यातच तिला सब्बीर खानचा ‘हिरोपंती’ हा सिनेमा मिळाला. २०१४ साली याच सिनेमातून कृतीने टायगरसोबत हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये यशस्वी पदार्पण केले. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट पदार्पणचा पुरस्कार देखील मिळाला.

क्रितीने तिच्या सहा वर्षाच्या करिअरमध्ये ‘बरेली की बर्फी’, ‘लुका छुपी’, ‘दिलवाले’, ‘राबता’, ‘अर्जुन पटियाला’, ‘पानिपत’, ‘हाऊसफुल्ल ४’ आदी एकून अकरा चित्रपटांमध्ये झळकली. यासोबतच तिने अनेक सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. तसेच ती काही म्युझिक व्हिडिओमध्ये देखील झळकली आहे.

आजच्या घडीला क्रिती इंडस्ट्रीमधील यशस्वी अभिनेत्रींमध्ये गणली जाते. खूप कमी काळात तिने तिच्या मेहनतीच्या आणि प्रतिभेच्या जोरावर स्वतःचे स्थान निर्माण केले. क्रितीच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाले, तर ती आज करोडो रुपयांची मालकीण आहे. तिच्याकडे ३४ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे सांगितले जाते. ती एका सिनेमासाठी जवळपास २ कोटी चार्ज करते. जाहिरातींमधून देखील ती बक्कळ पैसे कमावते. याशिवाय तिच्याकडे BMW 3 Series, Audi Q7 अशा महागड्या गाड्या देखील आहे.

नुकताच क्रितीचा ‘मिमी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे . आगामी काळात ती ‘बच्चन पांडे’, ‘भेडिया’, ‘आदिपुरुष’ या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

श्रीदेवी शेर, तर अमिताभ सव्वाशेर! कामंच करायचं नाही म्हणून बसलेल्या अभिनेत्रीला महानायकांनी ‘असं’ पटवलेलं

देवाघरी गेलेल्या बप्पी दांकडे किती रुपयांचं सोनं होतं? आकडा वाचूनच येईल आकडी

अरे देवा! गाणं रिलीझ व्हायच्या आधीच झालं राकेश-शमिताचं ब्रेकअप; आता म्हणतायेत, ‘तुमच्यासाठीच…’

हे देखील वाचा