अभिनेत्री लीना चंदावकर रवीराव यांनी नुकताच त्यांचा वाढदिवस (29 ऑगस्ट) साजरा केला. त्यांचा जन्म 29 ऑगस्ट 1950 रोजी कर्नाटक येथील धारवाडमध्ये झाला असून त्यांनी वयाची एकाहत्तरी गाठली आहे. त्यांनी अभिनय क्ष्रेत्रामध्ये खूप नाव कमावले. त्यांचे चाहते आजही त्यांचे चित्रपट आवडीने पाहता. लीना यांनी अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेऊ.
त्यांनी ‘मन का मीत’ या सिनेमातून अभिनयात पदार्पण केले. या चित्रपटाची निर्मिती अभिनेते सुनील दत्त यांनी केली होती. एका वृत्तानुसार नरगिस यांनीच लीना यांना या चित्रपटासाठी तयार केले होते. या चित्रपटामध्ये त्यांनी आपली भूमिका उत्तमपणे बजावली. त्यानंतर त्या ‘मेहबूब की मेहंदी’, ‘हमजोली’, ‘प्रीतम’, ‘रखवाला’ आदी अनेक चित्रपटांमध्ये दिसल्या.
लीना यांनी १९७५ साली राजकीय कुटुंबातील सिद्धार्थ बांदोडकर यांच्याशी लग्न केले. मात्र दुर्दैवाने एक वर्षाच्या आतच त्यांच्या पतीचे गोळी लागल्यामुळे निधन झाले. या मोठ्या धक्क्यामुळे त्या नैराश्यात गेल्या. त्यांचे अभिनीत देखील मन लागत नव्हते.
साल 1980मध्ये त्यांनी किशोर कुमार यांच्याशी विवाह केला. त्यांच्या लग्नाला लीना यांच्या वडिलांचा विरोध होता. कारण तेव्हा लीना अवघ्या 25 वर्षाच्या होत्या आणि किशोर कुमार त्यांच्यापेक्षा 20 वर्ष मोठे होते. परंतु एकदा ते सायंकाळी लीना यांच्या घरी त्यांच्या कुटुंबियांची समजूत काढण्यासाठी. तेव्हा लीना यांचे वडील श्रीनाथ चंदावरकर देखील घरी होते. किशोर यांना पाहून ते खूप चिडले. त्यांची समजूत काढण्यासाठी किशोर कुमार यांनी खूप गाणी गायली. रात्रभर त्यांची गाणी ऐकून चंदावरकर कुटुंबीय खूप खुश होते. त्यांनतर सकाळ होताच किशोर यांनी ‘नफरत करने वालों के सीने में प्यार भर दूं…’ हे गाणे गायला सुरुवात केली. त्यांचे हे गाणे ऐकून श्रीनाथ चंदावरकर उठले आणि त्यांना मिठी मारली आणि म्हणाले की, ” मला विश्वास आहे की, माझी मुलगी तुझ्याबरोबर सुखी राहील.”
किशोर कुमार यांचा लीना यांच्याशी चौथे लग्न केले होते. 1980 साली मध्ये लीना यांच्या बरोबर किशोर कुमार यांनी विवाह केला. लग्नानंतर लीना यांनी किशोर यांना सांगितले की, ” मला पुन्हा चित्रपटांमध्ये काम करावेसे वाटत आहे.” परंतु किशोर कुमारांनी त्यांना नकार देत सांगितले की,” तू चित्रपटांमध्ये भरपूर काम केले आहे. आता तुझे आराम करण्याचे दिवस आहेत. तू आपल्या घरामध्ये राणी प्रमाणे आराम करत रहा.” हे दोघेही एकमेकांबरोबर सुखी आयुष्य जगले. त्यानंतर साल 1987 मध्ये किशोर कुमार यांचा मृत्यू झाला.
हेही नक्की वाचा-
–अभिनेत्यासोबत एक व्यावसायिक देखील आहे करणसिंग बोहरा, ‘या’ ब्रँडचा आहे मालक
–तब्बल ‘इतक्या’ कोटी संपत्तीचे मालक आहेत सुपरस्टार नागार्जुन; घरच नाही, तर गाड्यांचीही किंमत कोटींच्या घरात