Tuesday, July 9, 2024

‘शांती’ मालिकेपासून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या मंदिराने क्रिकेट अँकरिंग करत मिळवली होती तुफान वाहवा

अभिनेत्री मंदिरा बेदीचा जन्म १५ एप्रिल १९७२ रोजी झाला होता. मंदिरा बेदी ही अशी अभिनेत्री आहे, जिचे वयानुसार सौंदर्यही अधिकच वाढत चालले आहे. मंदिराचा फिटनेस आजकालच्या नव्या अभिनेत्रींना मात देईल असाच आहे. तिच्याकडे पाहता कोणीही असे म्हणू शकत नाही की, ती ५० वर्षांची आहे. मंदिरा त्या अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने छोट्या पडद्यापासून प्रवास सुरु करत बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मोहित केले. एक अभिनेत्री असण्यासोबतच मंदिरा टीव्ही सादरकर्ता अर्थात अँकर म्हणूनही खूप यशस्वी झाली.

मंदिरा बेदीने १९९४ मध्ये दूरदर्शनचा अतिशय प्रसिद्ध शो ‘शांती’ पासून तिच्या कारकिर्दीची सुरूवात केली होती. या लोकप्रिय मालिकेत तिच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी तुफान पसंती दिली. ‘शांती’ ही एक दीर्घकाळ चालणारी मालिका होती. ‘शांती’ अशी मालिका मानली जाऊ शकते, जिने केबलच्या युगातील स्त्रियांवर आधारित डेली सोपची पायाभरणी केली. यातील तिच्या लूकबद्दल सतत चर्चा होत असे. ‘शांती’ व्यतिरिक्त मंदिरा ‘आहट’, ‘औरत’, ‘घर जमाई’, ‘सास भी कभी बहु थी’ या प्रसिद्ध मालिकेचा भाग राहिली आहे. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे, आधुनिक ड्रेस असो किंवा पारंपारिक साडी, प्रत्येक ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसते.

क्रिकेटप्रेमी मंदिरा बेदीला जेव्हा चाहत्यांनी क्रिकेटच्या मैदानावर क्रिकेटचे बारकाईने विश्लेषण करताना पाहिले, तेव्हा तिची नवीन स्टाईल पाहून सर्वच खूप आश्चर्यचकित झाले होते. मंदिरा तिच्या फिटनेसबाबत खूप सावध आहे. आपले फिजीक अर्थात शरिरयष्टी राखण्यासाठी, मंदिरा बेदीने लग्नाच्या सुमारे १२ वर्षानंतर मुलाला जन्म दिला होता. याशिवाय तिने चार वर्षांची लहान मुलगी असलेल्या ताराला दत्तक घेतले आहे. मंदिराने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, “मी जेव्हा ३९ वर्षांची होते तेव्हा मी मुलाला जन्म दिला. मला भीती होती की, मी गरोदर राहिल्यास माझी कारकीर्द संपेल.” मंदिरा तिची तंदुरुस्ती टिकवण्यासाठी खूप मेहनत घेते.

मंदिरा बेदीने बराच काळ क्रिकेट सामन्यांसाठी टीव्ही सादरकर्ता म्हणून काम केले आहे. साडी आणि स्लीव्हलेस ब्लाउजमध्ये तिचा ग्लॅमरस लुक खूप चर्चेत राहायचा. टीव्हीसोबतच मंदिराने बॉलिवूडमध्ये तिच्या कारकिर्दीची सुरूवात ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या हिट चित्रपटाद्वारे केली होती. चित्रपटांव्यतिरिक्त मंदिराने वेब सिरीजमध्ये देखील काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा