बॉलिवूडमध्ये सौंदर्यवतींची कमी नाही. एकपेक्षा एक सरस अभिनेत्री बॉलिवूडमध्ये आहेत. जर बॉलिवूडमधील अभिनेत्रींना पाहिले तर आपल्या लक्षात येईल की, बहुतकरून अभिनेत्रींनी विविध सौंदर्य स्पर्धा जिंकल्या आणि मग त्यांनी चित्रपटांमध्ये पदार्पण केले. ऐश्वर्या राय, सुश्मिता सेन, प्रियांका चोप्रा ही काही त्यातलीच उदाहरणं. या अभिनेत्री इतरांच्या तुलनेत जास्त यशस्वी झाल्यामुळे त्यांची नावं पटकन लक्षात राहतात. काही अशा देखील अभिनेत्री आहेत, ज्यांनी अशा काही सौंदर्य स्पर्धा जिंकल्या बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, पण त्यांना अपेक्षित यश काही मिळाले नाही. मात्र तरीही त्या त्यांची ओळख निर्माण करण्यात यशस्वी नक्कीच ठरल्या. अशीच अभिनेत्री म्हणजे नेहा धुपिया. नेहा जरी मुख्य नायिका म्हणून पाहिजे तितकी यशश्वी झाली नसली तरी तिने सहायक भूमिकांमध्ये तिची चांगलीच छाप प्रेक्षकांवर सोडली आहे. आज नेहा तिचा ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे, त्यानिमित्ताने प्रकाश टाकूया तिच्या अभिनयाच्या प्रवासावर.
नेहाचा जन्म २७ ऑगस्ट १९८० साली केरळमधील कोची येथे एका शीख परिवारात झाला. तिचे वडील इंडियन नेव्हीमध्ये अधिकारी होते, तर आई गृहिणी. शालेय शिक्षण कोचीमधून झाल्यानंतर पुढे तिने तिचे उच्च शिक्षण दिल्लीमधून घेतले. त्यानंतर जाहिरात कंपनीमध्ये काम करत असताना तिने मॉडेलिंग करायला सुरुवात केली. यातच तिला २००२ साली ‘राजधानी’ या मालिकेत एक भूमिका मिळाली, आणि तिचा अभिनयच प्रवास सुरु झाला. सोबतचा तिने फेमिना मिस इंडियामध्ये देखील सहभाग घेतला आणि ती स्पर्धा जिंकली आणि ती मिस इंडिया युनिव्हर्स झाली. पुढे ती मिस युनिव्हर्समध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी यूएसमध्ये गेली, पण ही यात यशस्वी झाली नाही. मात्र टॉप टेनमध्ये तिची नाव झाली होती. (happy birthday neha dhupia)
त्यानंतर २००३ साली तिने ‘कयामत: सिटी अंडर थ्रेट’ या सिनेमातून चित्रपटांमध्ये पदार्पण केले. या सिनेमात तिने अजय देवगांच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली होती. पण हा सिनेमा यशस्वी झाला नाही. तिला खरी ओळख आणि प्रसिद्धी मिळाली ती २००४ साली आलेल्या ‘जुली’ सिनेमातून. या सिनेमात नेहाचा बोल्ड आणि ग्लॅमरस अवतार सर्वांनाच भावला.
मात्र असे असूनही तिला मुख्य भूमिकांमध्ये अपेक्षित यश काही मिळाले नाही. ती जेवढी सहायक भूमिकांमधून ओळखली गेली तेवढी ओळख तिला मुख्य अभिनेत्री म्हणून स्वीकारले नाही. ‘शीशा’, ‘शूटआऊट एट लोखंडवाला’, ‘सिंग इज किंग’, ‘चूप चूप के’, ‘एक चालीस की लास्ट लोकल’ आदी अनेक चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या. नेहाने हिंदीसोबतच मल्याळम, उर्दू, जपानी, तेलगू, पंजाबी आदी भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले.
नेहा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि तिच्या अफेयरमुळे देखील खूप गाजली. नेहा आजजरी विवाहित असली तरी तिच्या जीवनात अंगद आधी तीन मुलं होते. सर्वात आधी ती स्क्वैश खेळाडू असणाऱ्या ऋत्विक भट्टाचार्याला डेट करत होती. जवळपास १० वर्ष नात्यात राहिल्यानंतर त्यांनी ब्रेकअप केले. त्यानंतर तिच्या आणि युवराज सिंग यांच्या अफेयरच्या चर्चा देखील खूप रंगल्या. त्यानंतर ती जेम्स सिल्वेस्टरसोबत नात्यात होती. जवळपास तीन वर्ष ते नात्यात राहिले, आणि नंतर वेगळे झाले.
जहीर खान आणि सागरिका घाटगे यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला ती अंगद बेदीसोबत आली तेव्हा तिच्या आणि अंगद बेदीच्या अफायरच्या चर्चा सुरु झाल्या. अचानक २०१८ साली त्यांनी लग्न केल्याची घोषणा केली. मेमध्ये त्यांनी लग्न केले आणि नोव्हेंबरमध्ये तिने एका मुलीला जन्म दिला. यावरून च ती लग्नाआधी प्रेग्नेंट राहिल्यामुळे एवढ्या घाईत लग्न केल्याचे समोर आले. आता नेहा दुसऱ्यांदा प्रेग्नेंट असून लवकरच ती त्यांच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे.
नेहा लवकरच तिच्या आगामी ‘ए थर्सडे’मध्ये प्रेग्नेंट कॉपच्या भूमिकेत दिसणार असून तिने स्वतः तिचा फर्स्ट लुक शेयर केला आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-राज कुंद्राच्या अटकेदरम्यान शिल्पा शेट्टीने शेअर केली पोस्ट; म्हणाली, ‘मी चूक केलीय…’
-ज्याला राम गोपाल वर्मा म्हणाले होते, ‘हा मी नाही’; तोच व्हिडिओ शेअर करत इनाया म्हणतेय, ‘हे आम्हीच…’