Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

जयपूरचा सामान्य मुलगा बनला बॉलिवूडचा खास, जाणून घ्या राजीव खंडेलवालचा सिनेप्रवास

बॉलिवूड अभिनेता राजीव खंडेलवालने टीव्ही आणि बॉलिवूड दोन्ही इंडस्ट्रीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने १९९८ मध्ये टीव्ही सीरियल ‘बनफूल’द्वारे टीव्ही अभिनेता त्याने म्हणून पदार्पण केले. या शोमध्ये तो महाराजांच्या भूमिकेत दिसला होता. पण राजीवला २००२ मध्ये ‘क्या हादसा क्या हकीकत’ या मालिकेतून घराघरात ओळख मिळाली आहे. 

यानंतर राजीव लोकप्रिय शो ‘कहीं तो होगा’मध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसला होता. त्याची नवीन मालिका ‘लेफ्ट राइट लेफ्ट’ आली, ज्यात त्याने कॅप्टनच्या भूमिकेत अप्रतिम काम केले. २०१५ मध्ये राजीव खंडेलवालची सर्वात लोकप्रिय मालिका ‘रिपोर्टर’ आली, या मालिकेत राजीव रिपोर्टरच्या भूमिकेत दिसला. यातून असे समजले की, तो किती प्रतिभावान अभिनेता आहे आणि तो सर्व प्रकारच्या भूमिका करू शकतो. राजीव खंडेलवाल शनिवारी (१५ ऑक्टोबर) आपला ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे.

भारतीय सैन्यात कर्नल होते वडील
राजीवचा जन्म १६ ऑक्टोबर १९७५ रोजी राजस्थानच्या एका सामान्य मारवाडी कुटुंबात झाला. त्याचे वडील भारतीय लष्करात कर्नल होते. राजीव त्याच्या तीन भावांमध्ये सर्वात लहान आहे. त्याने शालेय शिक्षण जयपूरमधूनच केले. नंतर त्याने हैदराबादमधून पदवी घेतली आणि मॉडेल म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. जाहिरातींमध्ये एक मॉडेल म्हणून दीर्घकाळ काम केल्यानंतर, राजीव खंडेलवाल टीव्हीच्या जगाकडे वळला होता.

राजीव खंडेलवालचा पहिला चित्रपट
टीव्ही मालिकांमध्ये काम केल्यानंतर २००८ मध्ये राजीवने चित्रपटांमध्ये नशीब आजमावले आणि ‘आमिर’ चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यानंतर तो अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसला आणि प्रत्येक चित्रपटात त्याच्या अभिनयाचे कौतुक झाले आहे.

 

‘मी टू’ हॅशटॅग अंतर्गत सांगितली एक घटना’
‘मी टू’ मूव्हमेंट हॅशटॅग अंतर्गत अनेकांनी त्याच्या जीवनाशी संबंधित कथा शेअर केल्या होत्या. राजीव हे त्यापैकी एक होता. त्याने मीटूच्या अंतर्गत सांगितले की, एकदा एका दिग्दर्शकाने त्याला त्याच्या ऑफिस चित्रपटावर चर्चा करण्यासाठी बोलावले आणि दुसऱ्यांदा त्याच दिग्दर्शकाने त्याला ऑफिसऐवजी त्याच्या खोलीत बोलावले. जिथे त्यांनी राजीवला बसण्यास सांगितले. पण चित्रपटाची कथा सांगण्यास नकार दिला. राजीव सांगतो की, त्या दिग्दर्शकाबरोबर गोष्टी योग्य नव्हत्या.

राजीवने सांगितले की, “तो मला खोलीत येण्यास सांगत होता. जेव्हा मी त्याला नकार दिला, तेव्हा तो म्हणाला की तू टीव्हीमध्ये काम करणारा नवीन माणूस आहेस आणि तू मला नकार देत आहेस.” मात्र, नंतर त्याच दिग्दर्शकाने राजीवला दोन चित्रपटांची ऑफर दिली. पण त्याने नकार दिला. या सर्व गोष्टी राजीवने एका माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितल्या होत्या.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ज्येष्ठ अभिनेत्री बेगम फारुख जाफर साहिबा काळाच्या पडद्याआड, आज केले जाईल ‘सुपूर्द-ए-खाक’

-चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही हेमा यांची लव्हस्टोरी, भर मंडपात जितेंद्र यांना सोडून धरला होता धर्मेंद्र यांचा हात

-सूर्यास्ताच्या वेळी समुद्र किनारी स्वतःचा सहवास एन्जॉय करताना दिसली पूजा सावंत, आकर्षक लूकने चाहते घायाळ

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

हे देखील वाचा