Friday, February 3, 2023

रामचरच्या ‘आरआरआर’ सिनेमाआधी ‘या’ चित्रपटांनी घातला होता बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरण आज (२७ मार्च) रोजी त्याचा ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. या वर्षीचा रामचरणचा वाढदिवस त्याच्यासाठी खूपच खास असणार आहे. कारण नुकताच त्याचा ‘आरआरआर’ हा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित सिनेमा प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर लगेच प्रेक्षकांनी सिनेमाला डोक्यावर उचलून धरले आहे.

रामचरण हा साऊथ इंडस्ट्रीमधील सुपरस्टार अभिनेता असून, त्याला फक्त दाक्षिणात्य इंडस्ट्रीचा नाही तर संपूर्ण जगात अमाप फॅन फॉलोविंग आहे. रामचरणला ऍक्शन हिरो, रोमान्सकिंग म्हणून देखील ओळखले जाते. त्याने त्याच्या प्रत्येक भूमिकांमधून त्याच्यातल्या अभिनेत्याला प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरे उतरवले आहे. सध्या त्याचा ‘आरआरआर’ सिनेमा जरी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असला तरी याआधी देखील त्याने त्याच्या चित्रपटांमधून बक्कळ कमाई केली आहे. जाणून घेऊया त्याच्या अशाच काही चित्रपटांबद्दल.

मगधीरा :
रामचरणचे नाव घेतले की, सर्वात आधी आठवतो तो त्याचा ‘मगधीरा’ सिनेमा. हा सिनेमा रामचरणचा सर्वात गाजलेला आणि तुफान हिट झालेला सिनेमा म्हणून ओळखला जातो. मागधीरा सिनेमात पुनर्जन्माची कहाणी दाखवण्यात आली असून ती प्रेक्षकांना शेवट्पर्यंत आपल्याशी जोडून ठेवते आणि मनाचा ठाव घेण्यास यशस्वी होते. रामचरण याचा हा सिनेमा युटूबसोबतच अमेझॉन प्राईमवर सूड उपलब्ध आहे.

चिरुथा :
पुरी जगन्नाथ दिग्दर्शित रामचरणचा ‘चिरुथा’ हा एक ऍक्शन थ्रिलर ड्रामा सिनेमा आहेत. या सिनेमात रामचरणने एका गाईडची भूमिका निभावली होती. या सिनेमात एका लहान मुलासमोर त्याच्या वडिलांचा खून केला जातो. या सिनेमाला देखील तुम्ही अमेझॉन प्राईमवर बघू शकतात.

बेटिंग राजा :
संपत नंदीद्वारा दिग्दर्शित केलेला हा एक ऍक्शन थ्रिलर सिनेमा आहे. रामचरच्या करिअरमधील बेटिंग राजा हा सर्वात जास्त हिट झालेला आणि गाजलेला सिनेमा म्हणून ओळखला जातो. हा सिनेमा वूट अँपवर बघण्यासाठी उपलब्ध आहे.

येवडू :
येवडू या सिनेमात ऍक्शनचा डबल डॉस प्रेक्षकांना पाहता येणार आहे, या सिनेमात रामचरणसोबत अल्लू अर्जुन देखील मुख्य भूमिकेत आहे. सिनेमात तुम्हाला मोठ्या प्रमाणावर एंटरटेनमेंट मिळू शकते. हा सिनेमा एमएक्स प्लेअर या ओटीटी प्लँटफॉर्मवर उपलब्ध आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा