रवी दुबेने (Ravi Dubey) आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. मॉडेलिंगनंतर रवीने २००६ मध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने २००६ मध्ये टेलिव्हिजनच्या ‘स्त्री…तेरी कहानी’ या शोमधून टीव्ही जगतात प्रवेश केला. या शोमध्ये तो मुख्य भूमिकेत होता आणि त्याची निर्मिती दिलीप कुमार आणि सायरा बानो यांनी केली होती. यानंतर त्याने ‘हम सिकंदर’ आणि ‘रणबीर रानो’ या शोमध्ये काम केले. रवी शनिवारी (२३ डिसेंबर) त्याचा ४०वा वाढदिवस साजरा करत आहे.
रवीला पुन्हा लोकप्रियता शो ‘१२/२४ करोल बाग शो’ मधून मिळाली. या शोमध्ये रवीसोबत सरगुन मेहता मुख्य भूमिकेत होती. या शोमधून रवी आणि सरगुन यांच्यातील प्रेमाची सुरुवात झाली. हा शो दोघांसाठी खूप खास होता. शो संपेपर्यंत दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
रवीने त्यानंतर ‘सास बिना ससुराल’, ‘मेरी मां’ यांसारख्या शोमध्ये काम केले. त्यानंतर तो ‘नच बलिए’, ‘श्रीमान बनाम श्रीमती’, ‘इंडियाज डान्सिंग सुपरस्टार’ यांसारख्या रियॅलिटी शोमध्ये दिसला.
यानंतर रवीने ‘जमाई राजा’ या शोमधून धमाल केली. या शोमुळे रवी टीव्हीचा स्टार बनला. शोमध्ये रवीसोबत निया शर्मा लीड रोलमध्ये होती. हा शो बरीच वर्षे चालला. इतकंच नाही, तर रवीच्या शोचा दुसरा सीझनही याच वर्षी आला होता. पण तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता आणि यावेळी हा शो खूपच बोल्ड होता. यामध्ये रवी आणि नियाचे अनेक हॉट आणि बोल्ड सीन्स पाहायला मिळाले.
नुकतीच रवीची ‘मत्स्यकांड’ ही सिरीज प्रदर्शित झाली असून, त्यात रवी किशन रवीसोबत असून दोघांच्या कामाचे कौतुक होत आहे. आता अभिनेता होण्यासोबतच रवी निर्माताही झाला आहे. रवी आणि त्याची पत्नी सरगुन यांनी मिळून ‘उडारियां’ या शोची निर्मिती केली आहे. निर्माते म्हणून दोघांनीही चांगले काम केले आहे.
हेही वाचा-
–‘सत्यशोधक’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च: ज्योतिराव-सावित्रीमाईंच्या संघर्षमय गाथेची झलक पाहाच
–अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा PETAकडून सन्मान, पुरस्कार मिळाल्यावर अभिनेते भावूक