अभिनेत्री ‘संदिपा धर’ ही एक नावजलेली अभिनेत्री आहे. तिची कीर्ती संपूर्ण बॉलिवूडमध्ये पसरलेली आहे. तीने अनेक चित्रपटांमध्ये काम करून चाहत्यांची मनं जिंकली आहेत. यासोबतच संदीपाने काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘कागज’ या चित्रपटात आयटम साँग देखील केले आहे. संदीपा ही उत्कृष्ट डान्सर आणि अभिनेती म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहे. आज 2 फेब्रुवारीला संदीपा आपला ३२वा वाढदिवस साजरा करत आहे आणि म्हणूनच मंडळी आम्ही तुम्हाला आज संदीपाबद्दल काही खास गोष्टी सांगणार आहोत.
संदीपा हीचा जन्म ‘श्रीनगर’ इथे झाला आहे. लहानपणापासूनच तीला डान्सचे वेड होते आणि याच कारणामुळे तीने डान्सचे प्रशिक्षण देखील घेतले आहे. लहाणपणी तिने डान्सची अनेक बक्षीस देखील जिंकली आहेत. तब्बल ४ वर्ष तीने ‘शामक डावर’ आणि ‘टेरेंस लुईस’ यांच्याकडे जाज आणि कंटेम्परेरी डान्स याच प्रशिक्षण घेतलं आहे. २०१० साली आलेल्या इसी लाईफ मे या सिनेमातून तीने आपले बॉलीवूड पदार्पण केले. या चित्रपटात संदीपासोबत अभिनेता ‘अक्षय ओबेरॉय’ हा मुख्य भूमिकेत होता.
खूप कमी फॅन्सला ही गोष्ट माहित आहे की ,संदीपा ही कोट्यवधी रुपये तसेच खूप मोठ्या संपत्तीची मालकीण आहे. ती अगदी ऐशोआरामात आयुष्य जगते. संदीपाला उन्हाची ऍलर्जी असल्यामुळे ती नेहमी सावलीतच असते. खऱ्या अर्थाने ती एखाद्या महाराणीसारखं तीच आयुष्य जगते.
संदीपाचं प्राणीमात्रावर खूप प्रेम आहे. याच एक उदाहरण देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं. जेव्हा मुंबईमध्ये जोराचा पाऊस पडत होता तेव्हा त्या पावसात एक कुत्रा थंडीने कुडकुडत होता. त्यावेळी संदीपाने त्या कुत्र्याला पाहिले आणि त्याला स्वतः सोबत आपल्या घरी घेऊन गेली. पुढे तिने त्या कुत्र्याची खूप काळजी घेतली.
संदीपाच्या वर्कफ्रन्टबद्दल बोलायचे झाल्यास, संदीपाने ‘हिरोपंती’ या सिनेमात ‘टायगर श्रॉफ ‘सोबत काम केले आहे. तसेच तिने ‘दबंग 2’ मध्ये देखील किमयाच पात्र निभावलं होत. संदीपाने काही दिवसांपूर्वीच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या ‘अभय ‘या सीरिजमध्ये देखील महत्वाचं पात्र निभावलं होतं. या सीरिजमध्ये अभिनेता ‘कुणाल खेमु’ हा मुख्य भूमिकेत होता. संदीपा आताच आलेल्या क्राईम ड्रामावर आधारित ‘मुंभाई’ या सीरिजमध्ये दिसली होती. ती सध्या ‘विक्रम भट्ट’ हे दिग्दर्शित करत असलेल्या ‘डर्टी गेम्स’ या वेब सीरिजच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.