Wednesday, July 3, 2024

काय सांगता! सलमान खान आणि टायगर श्रॉफसोबत काम केलेली ‘ही’ अभिनेत्री उन्हात बाहेरदेखील नाही पडत

अनेक अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाच्या आणि इतर कौशल्यांच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपली छाप सोडली आहे. यामध्ये अभिनेत्री आणि डान्सर ‘संदीपा धर’ हिचा देखील समावेश आहे. संदीपा ही एक नावाजलेली अभिनेत्री आहे. तिची कीर्ती संपूर्ण बॉलिवूडमध्ये पसरलेली आहे. ‘संदीपा धर’ हिने अनेक चित्रपटांमध्ये काम करून चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत. यासोबतच संदीपाने काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘कागज’ या चित्रपटात ‘आयटम साँग’ सुद्धा केले आहे. तसेच संदीपा ही उत्कृष्ट डान्सर आणि अक्टर म्हणून सगळीकडे प्रसिध्द आहे. संदीपाने नुकताच आपला 31 वा वाढदिवस साजरा केला. तिचा जन्म 2 फेब्रुवारी 1989 साली झाला होता. तिच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला आज तिच्याबद्दल काही खास गोष्टी सांगणार आहोत.

संदीपा हीचा जन्म ‘श्रीनगर’ इथे झाला आहे. ती एक प्रशिक्षित डान्सर देखील आहे. तिने डान्सची अनेक बक्षीसे देखील मिळवली आहेत. तिने 4 वर्ष ‘श्यामक डावर’ आणि ‘टेरेंस लुईस’ यांच्याकडे जैज आणि कंटेम्परेरी प्रशिक्षण घेतलं आहे. अभिनेत्री संदीपा हिने 2010 साली राजश्री प्रॉडक्शनचा हिंदी चित्रपट ‘इसी लाईफ में’ यामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात संदीपासोबत अभिनेता ‘अक्षय ओबेरॉय’ हा मुख्य भूमिकेत होता.

खूप कमी चाहत्यांना ही गोष्ट माहित आहे की, संदीपा ही कोट्यवधी संपत्तीची मालकीण आहे. ती अगदी ऐशोआरामात आयुष्य जगते. संदीपाला उन्हाची ऍलर्जी असल्यामुळे ती नेहमी सावलीतच असते. एका बाजूने बघायला गेलं, तर ती अभिनेत्री राणी सारखं तिचं आयुष्य जगत आहे.

संदीपाचं प्राण्यांवर खूप प्रेम आहे. याचं एक उदाहरण देखील आपल्याला पाहायला मिळालं आहे. मुंबईमध्ये जेव्हा जोरात पाऊस पडत होता, तेव्हा त्या पावसात एक कुत्रा थंडीने कुडकुडत होता. त्यावेळी संदीपाने त्या कुत्र्याला पाहिले आणि त्याला स्वतः सोबत आपल्या घरी घेऊन गेली. त्यानंतर तिने त्या कुत्र्याची खूप काळजी घेतली.

संदीपाच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तिने ‘हिरोपंती’ या सिनेमात ‘टायगर श्रॉफ’सोबत काम केले आहे. तसेच तिने सलमान खानच्या ‘दबंग 2’ या सिनेमामध्ये देखील किमयाची भूमिका साकारली आहे. तसेच संदीपाने काही दिवसांपूर्वी ओटीटीवर रिलीज झालेल्या ‘अभय ‘या सीरिजमध्ये देखील महत्त्वाची भूमिका निभावली. या सीरिजमध्ये ‘कुणाल खेमु’ हा मुख्य भूमिकेत होता. संदीपा आताच आलेल्या क्राईम ड्रामावर आधारित ‘मुम भाई’ या सीरिजमध्ये दिसली होती. संदीपा आता ‘विक्रम भट्ट’ यांनी दिग्दर्शित केलेली ‘डर्टी गेम्स’ या वेब सीरिजची शूटिंग करत आहे.

हेही वाचा-

करोडो रुपयांची मालकीण; मोठी संपत्ती आणि वय केवळ ३२ वर्ष, जाणून घ्या महाराणीसारखं आयुष्य जगणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीबद्दल

हे देखील वाचा