बॉलिवूड अभिनेता संजय मिश्रा शुक्रवारी(6 ऑक्टोबर) आपला 60 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांनी चित्रपटसृष्टीत तसेच छोट्या पडद्यावर अनेक उत्तम पात्र साकारले आहेत. याशिवाय त्यांनी अनेक दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येही काम केले आहे. संजय मिश्रा त्यांच्या उत्कृष्ट अभिनय आणि उत्कृष्ट कॉमिक टायमिंगसाठी ओळखले जातात. त्यांनी विनोदी ते गंभीर पात्र साकारले आहेत. चला तर मग त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चित्रपटांबद्दल जाणून घेऊया.
संजय मिश्रा यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1963 रोजी बिहारच्या दरभंगा येथील साक्री या छोट्या गावात झाला. त्यांचे वडील पीआयबीमध्ये काम करत होते आणि त्यांचे आजोबा भारतीय सेवा अधिकारी होते. सरकारी नोकरीमुळे वडिलांची वाराणसीला बदली झाली. संजय मिश्रा यांनी येथे बीएचयूच्या केंद्रीय विद्यालयातून शिक्षण घेतले. नंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला आणि अभिनयाचे शिक्षण घेतले. त्यांनी 1989 साली ग्रॅज्युएशन पुर्ण केले.
संजय मिश्रा यांनी 1995 मध्ये ‘ओह डार्लिंग ये है इंडिया’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्यांनी ‘भाई साहेब’ची भूमिका साकारली होती. त्यांचा सर्वोत्कृष्ट अभिनय चित्रपटात पाहायला मिळाला. हा चित्रपट २००९ मध्ये अमेरिकेतील मंदी आणि संपूर्ण जगावर पडलेला प्रभाव याच्या संबंधित होता. हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला. यासाठी संजय मिश्रा यांना कॉमिक रोलमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला. यानंतर त्यांनी अनिल कुमार आणि माधुरी दीक्षित यांच्या ‘राजकुमार’ चित्रपटात काम केले. 1998 मध्ये त्यांनी ‘सत्य’ चित्रपटात काम केले. दोन्ही चित्रपट सुपरहिट झाले. पण दोन्हीही चित्रपटात त्यांनी छोटी भूमिका साकारली होती.
चित्रपटांमध्ये पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी अनेक जाहिरातींसाठी चित्रीकरण केले. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत कोल्ड ड्रिंकची जाहिरातही केली. 1991मध्ये त्यांना ‘चाणक्य’ या टीव्ही मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. पण शूटिंगच्या पहिल्याच दिवशी त्यांनी 28 टेक दिले. यामुळे दिग्दर्शकाने त्यांना सहाय्यक दिग्दर्शकाकडे सोडले, जेणेकरून ते शूटिंगसाठी तयारी करू शकतील.
‘सत्य’ आणि ‘दिल से …’ या चित्रपटांतील भूमिकांमुळे त्यांना टीव्ही सिटकॉम ‘ऑफिस ऑफिस’ मध्ये शुक्लाची भूमिका मिळाली. या शोमधून त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. यात ते एका भ्रष्ट सरकारी कर्मचाऱ्याची भूमिका साकारली, जो फक्त पान खात असे. त्यानंतर त्यांनी टीव्ही मालिकांमध्ये काम करणे सुरू ठेवले. 2005 पर्यंत त्यांनी टीव्ही मालिकांमध्ये काम केले. त्यांनी त्याच वर्षी आलेल्या ‘बंटी और बबली’ चित्रपटात काम केले आणि त्यांना आपली ओळख मिळू लागली. यानंतर त्यांनी ‘अपना सपना मनी मनी’ मध्ये मोठी आणि महत्वाची भूमिका साकारली. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.
संजय मिश्रा त्यांच्या कॉमिक टायमिंगसाठी ओळखले जातात. 2010साली ‘फस गए रे ओबामा’ चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता अप्सरा पुरस्कार मिळाला. 2014 साली ‘आँखों देखी’ चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक) मिळाला. याशिवाय, त्यांना विविध पुरस्कार शोमध्ये ‘मसान’ आणि ‘कामयाब’ चित्रपटांसाठी नामांकन आणि पुरस्कार मिळाले.
हेही वाचा-
–राडाच ना! सोनम कपूरने शेअर केला हॉट फोटो
–हँडसम आणि डॅशिंग अभिनेते असणाऱ्या विनोद खन्ना यांनी अचानक घेतला होता चित्रपटांमधून संन्यास