Wednesday, July 3, 2024

एकेकाळी स्टेजवर करायची परफॉर्म, तर आता डान्स शोची परीक्षक आहे शक्ती; ‘असा’ होता तिचा प्रवास

शक्ती मोहनला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. ती २०१५ पासून स्टार प्लसवरील डान्स रियॅलिटी शो ‘डान्स प्लस’ मध्ये मार्गदर्शक आणि न्यायाधीश म्हणून काम करत आहे. पण सामान्य व्यक्तीपासून ते खासपर्यंतचा हा प्रवास तिच्यासाठी इतका सोपा नव्हता. आज ती एखाद्या शोला जज करत आहे, पण एकेकाळी तिनेही स्पर्धकाप्रमाणे स्टेजवर परफॉर्म केला आहे. शक्तीने झी टीव्हीच्या डान्स रियॅलिटी शो ‘डान्स इंडिया डान्स’ सीझन २ मधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. विशेष म्हणजे, ती सर्व डान्सर्सला धूळ चाखवत या शोची विजेती देखील बनली होती. मंगळवारी (१२ ऑक्टोबर) शक्ती मोहन तिचा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया तिच्या जीवनाशी संबंधित काही रंजक गोष्टी…

मूळची आहे मुंबईकर
शक्ती मोहनचा जन्म १२ ऑक्टोबर १९८५ रोजी मुंबईत झाला. शक्तीला चार बहिणी आहेत. तिच्या बहिणी आहेत नीती मोहन, मुक्ती मोहन आणि कृती मोहन. शक्ती मोहनची मोठी बहीण एक लोकप्रिय गायिका आहे आणि छोटी बहीण मुक्ती मोहन एक अभिनेत्री आणि डान्सर आहे. (happy birthday shakti mohan this fantastic dancer turns 36 today)

डॉक्टरने सांगितलं होतं, चालू नाही शकणार
लहानपणी शक्तीसोबत एक अपघात झाला होता. या दरम्यान, तिला गंभीर दुखापत झाली होती. ज्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं होतं की, ती पुन्हा कधीही चालू शकणार नाही. पण शक्तीने हार मानली नाही आणि कुटुंबाच्या मदतीने आणि तिच्या स्वतःच्या धैर्याने ती केवळ चालू शकली नाही, तर आज ती देशाची एक सुप्रसिद्ध डान्सर आहे.

मालिकेतही केलंय काम
‘डान्स इंडिया डान्स’ जिंकल्यानंतर शक्तीने ‘दिल दोस्ती डान्स’ मालिकेमध्ये महत्वाची भूमिका बजावली. ही मालिका पूर्णपणे डान्सवर आधारित होती. या शोमध्ये शक्तीसोबत कुंवर, शंतनू आणि वृषिका मुख्य भूमिकेत होते. हे तिघेही ‘डान्स इंडिया डान्स’चे डान्सर आहेत.

बॉलिवूडचा प्रवास
शक्ती मोहनने अनेक चित्रपटांच्या आयटम साँगमध्ये डान्स केला आहे. तिने ‘हायस्कूल म्युझिकल २’, ‘तीस मार खान’, ‘रावडी राठोड’, ‘कांची’, ‘नवाबजादे’ या चित्रपटांच्या गाण्यांमध्ये डान्स केला आहे. शक्ती ‘पद्मावत’ चित्रपटातील ‘नैनोवाले ने’ या गाण्याला कोरिओग्राफर करून या क्षेत्रात पदार्पण केले.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

नादच खुळा! अमिताभ बच्चन यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहणाऱ्या बॉडीगार्डला मिळतो ‘इतका’ पगार; आकडा तर वाचा…

अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण

सलमान खानने बहीण अर्पिताला लग्नात दिलं होतं ‘हे’ महागडं गिफ्ट, किंमत ऐकून तर फिरतील तुमचे डोळे

हे देखील वाचा