काही वर्षांपुर्वी होता रिअ‍ॅलिटी शोचा भाग; आज वावरतो हजारो चाहत्यांमध्ये, जाणून घ्या कॉलीवूडच्या शिवकार्तिकेयनचा थक्क करणारा प्रवास


कॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता शिवकार्तिकेयन, ज्याला एसके म्हणूनही ओळखले जाते. त्याचा जन्म 17 फेब्रुवारी 1986 रोजी झाला होता. तो आज त्याचा 35वा वाढदिवस साजरा करीत आहेत. शिवकार्तिकेयनच्या वाढदिवसानिमित्त आज आपण त्याच्या कारकिर्दीतील प्रवासाबद्दल जाणून घेऊयात.

शिवकार्तिकेयन याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात स्टार विजय वाहिनीवरच्या रिअ‍ॅलिटी शोद्वारे केली. 2012 मध्ये त्याने धनुष अभिनीत चित्रपट ‘थ्री’ मध्ये एक साईड भूमिका साकारली होती.

यानंतर 2013 मध्ये शिवकार्तीकेयनने ‘केडी बिल्ला किल्लाडी रंगा’, ‘एथिर निछल’ आणि ‘वरुथपदथा वलीबर संगम’ हे तीन चित्रपट केले. यासाठी शिवकार्तिकेयनला ‘एंटरटेनर ऑफ़ द इयर 2013’ या अवॉर्डने गौरविण्यात आले होते. त्याच्या कारकिर्दीत त्याने तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार, चार एडिसन पुरस्कार, तीन सिमा पुरस्कार व तीन विजय पुरस्कार जिंकले आहेत.

शिवकार्तिकेयनने ऐश्वर्या राजेशसोबत कन्नूरच्या ‘कृष्णमूर्ति’ या रीमेक चित्रपटातून तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 2019 मध्ये शिवकार्तिकेयन ‘नम्मा वेट्टू पिल्लई’ या फॅमिली ड्रामा चित्रपटात आणि ‘हिरो’ या सुपरहीट चित्रपटात दिसला होता.

तसेच, त्याचे ‘डॉक्टर’ आणि ‘अयलान’ हे चित्रपट या वर्षी (2021) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात त्याच्यासोबत रकुल प्रीत सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या शिवकार्तिकेयन त्याच्या निर्मिती कंपनी शिवकार्तिकेयन प्रॉडक्शन अंतर्गत चित्रपट बनवत आहे.

तो एक अभिनेत्याबरोबरच गायक, निर्माता आणि तमिळ चित्रपटांचा अँकरही राहिला आहे. आज त्याची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.