Friday, July 5, 2024

‘किंग खान’च्या मुलीला डेट करायचंय? मग करावे लागतील ‘हे’ ७ नियम फॉलो

प्रत्येक बाप हा आपल्या मुलीसाठी ती प्रत्येक गोष्ट करत असतो, जी त्याच्या तिच्यासाठी योग्य असते. मग तो यासाठी कोणत्याही थराला जातो. याबाबतीत बॉलिवूडचा किंग खानही अपवाद नाही. तोही आपल्या मुलीसाठी खूप संरक्षणात्मक (प्रोटेक्टिव्ह) आहे. शाहरुख खानला एक मुलगी आहे. तिचं नाव सुहाना खान आहे. शनिवारी (२२ मे) सुहाना आपला २१ वा वाढदिवस साजरा करत आहे. सुहानाचा जन्म २२ मे, २००० रोजी मुंबईत झाला होता. शाहरुख आणि गौरी यांची मुलगी सुहाना खूपच ग्लॅमरस आहे. अभिनयाची आवड असलेली सुहाना पदार्पणाची तयारी करत आहे. मात्र, ती मोठ्या पडद्यावर कधी येणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. आपल्या मुलीबाबत शाहरुखने स्वत: एक खुलासा केला होता की, सुहानाला डेट करणाऱ्या व्यक्तीसाठी त्याने सात नियम बनवले आहेत, ज्याचे पालन त्याला करावे लागेल.

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध सेलिब्रिटी किड आहे. ती आपल्या वडिलांच्या खूपच जवळ आहे. सन २०१७ मध्ये शाहरुखने स्पष्ट केले होते की, जर कोणत्याही मुलाला त्याच्या मुलीला डेट करायचे असेल, तर त्याला काही नियम पाळावे लागतील.

‘फेमिना’ला दिलेल्या मुलाखतीत शाहरुख खानने स्पष्ट केले होते की, त्याच्या मुलीच्या आयुष्यात चांगल्या व्यक्तीचे आगमन व्हावे. त्याला पुढील ७ नियम पाळावे लागतील.

हे आहेत ते ७ नियम

१. नोकरी असायला पाहिजे.
२. मी तुला पसंत करत नाही असे समजायचे.
३. नेहमी मी तुझ्यावर लक्ष ठेवत आहे.
४. वकील नेहमी सोबत असेल.
५. लक्षात ठेवावे, ती माझी राजकुमारी आहे, तू तिला जिंकले नाहीये.
६. जर तिला त्रास दिला, तर मला तुरुंगात जाण्याची भीती नाहीये.
७. तू जसा तिच्याशी वागशील, मी तुझ्याशीही तसेच वागेल.

तरीही यानंतर शाहरुखने मान्य केले की, हा एक ‘खोटा ढोंग’ आहे. एनडीटीव्ह स्पॉटलाईटवर त्याने म्हटले होते की, जेव्हा माझी मुलगी कुणाला पसंत करेल, तेव्हा मी काहीच करू शकणार नाही. मी फक्त ते सर्व स्वीकारेल.

सुहानाने अद्याप बॉलिवूड पदार्पण केले नसले, तरीही तिची फॅन फॉलोविंगही कमालीची आहे. ती सध्या आपले शिक्षण लंडन विद्यापीठातून पूर्ण करत आहे. सुहाना उच्चशिक्षण घेत आहे. तिला डान्सिंग आणि स्पोर्ट्स खूप आवडते. १८ वर्षांच्या वयात सुहानाने मॅगझिनच्या कव्हरवर पदार्पण केले होते. ती ग्लॅमर मॅगझिन वोगच्या पहिल्या पानावर ग्लॅमरस अवतारात दिसली होती. स्वत: शाहरुखने मॅगझिनचे कव्हर पेज लाँच केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अरे व्वा! आणखी ७८ वर्षे सोनी मॅक्सवर दिसणार ‘सूर्यवंशम’ चित्रपट, कारणही आहे तितकंच रंजक

-प्रसिद्ध गायिकेला करावा लागला होता लैंगिक शोषणाचा सामना, वयाच्या १९ व्या वर्षी होती गरोदर

-क्या बात है! मिथुन चक्रवर्ती यांचा ‘डिस्को डान्सर’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; दिवाळीच्या आसपास होणार रिलीझ

हे देखील वाचा