बॉलिवूड आणि टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री ‘हंसा’ म्हणजे सुप्रिया पाठक यांनी नुकताच 62 वा वाढदिवस साजरा केला. 7 जानेवारी, 1961 रोजी मुंबईत जन्मलेल्या सुप्रिया यांनी मोठ्या पडद्यासोबतच छोट्या पडद्यावरही आपली अभिनयाची जादू पसरवली आहे. सुप्रिया यांचे वडील बलदेव पाठक आहेत आणि आई दीना पाठक स्वत: एक अभिनेत्री तसेच गुजराती नाट्य कलाकार राहिल्या आहेत. त्यामुळे घरातूनच सुप्रिया यांना अभिनयाचा वारसा मिळाला आहे, असं म्हणायला हरकत नाही. इतकंच नव्हे, तर त्यांच्या सासरची मंडळीही चित्रपट क्षेत्राशी संबंधित आहेत. चला तर मग जाणून घेऊयात सर्वांच्या लाडक्या ‘हंसा’च्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्याशी संबंधित काही खास गोष्टी!
सुप्रिया पाठक यांनी अभिनेता पंकज कपूरशी यांच्याशी लग्न केलं आहे. ज्यांना मोठ्या पडद्याबरोबरच छोट्या पडद्यावरील टीव्ही कार्यक्रमांमुळेही ओळखलं जातं. सुप्रिया या पंकज कपूर यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत, तर सना कपूर आणि रुहान कपूर ही पंकज आणि सुप्रिया यांची दोन मुलं आहेत. शाहिद कपूरसुद्धा सुप्रिया यांचा सावत्र मुलगा आहे. इतकंच नाही तर बॉलिवूड अभिनेत्री रत्ना पाठक या सुप्रिया पाठक यांच्या बहीण असून त्यांनीही टीव्हीसोबतच मोठ्या पडद्यावर आपलं अभिनय कौशल्य दाखवलं आहे.
सुप्रिया पाठक यांनी 1982 च्या ‘कलयुग’ या चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली होती. या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता. यानंतर त्यांनी ‘विजेता’, ‘बाजार’, ‘मिर्च मसाला’, ‘ऐश’ आणि ‘शहेनशाह’ असे चित्रपट केले. 1986 साली सागर सरहदीच्या ‘अपना मौसम’ चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी सुप्रिया पंकज कपूरला भेटल्या होत्या. दोन वर्षांनंतर दोघांचंही लग्न झालं. परंतु, ज्या चित्रपटाच्या सेटवर हे दोघे एकत्र आले तो चित्रपट मात्र कधीच प्रदर्शित झाला नाही.
सुप्रिया यांची कारकीर्द एकेकाळी अगदी ठप्प झाली होती. अशा परिस्थितीत त्या टीव्ही इंडस्ट्रीकडे वळल्या. यानंतर ‘खिचडी’ शोमध्ये सुप्रिया ‘हंसा पारेख’च्या भूमिकेत दिसल्या. त्यांची ही भूमिका इतकी गाजली की या शोमुळे घराघरात सुप्रिया पाठक यांची ओळख निर्माण झाली. त्यांच्या यशाचा अंदाज आपण फक्त यावरूनच घेऊ शकतो की आजही बरेच लोक सुप्रिया पाठक यांना ‘हंसा पारेख’ म्हणूनच ओळखतात.
खिचडी व्यतिरिक्त सुप्रिया यांनी ‘बा बहु और बेबी’, ‘एक महल सपने का’ या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. बराच काळ मोठ्या पडद्यापासून दूर राहिल्यानंतर त्या ‘सरकार’ चित्रपटात दिसल्या. या व्यतिरिक्त त्यांनी ‘वेक अप सिड’ आणि ‘गोलियो की रास लीला-राम लीला’ या चित्रपटांमधील आपल्या अभिनयाने सर्वांचं मन जिंकलं आहे. (happy birthday supriya pathak from khichdi know her iconic role)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
घटस्फोटापासून ते धर्म बदलण्यापर्यंत विविध कारणांवरून दीपिका कक्करला करावा लागला ट्रोलिंगचा सामना
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या बिपाशाचा मार्ग नव्हता सोपा, पैशांची बचत म्हणून करायची 10 रुपयांत जेवण