Saturday, April 4, 2026
Home साऊथ सिनेमा दक्षिण भारतीय अभिनेत्रीची सुंदरता पाहून तुम्हीही जाल भारावून, सोशल मीडियावर फोटो घालतात नुसता धुमाकूळ

दक्षिण भारतीय अभिनेत्रीची सुंदरता पाहून तुम्हीही जाल भारावून, सोशल मीडियावर फोटो घालतात नुसता धुमाकूळ

दक्षिण भारतीय अदाकारा ईशा रेब्बा हे फिल्म इंडस्ट्रीमधील एक सुप्रसिद्ध नाव आहे. अभिनेत्री आपल्या हॉट लूकमुळे चाहत्यांना वेड लावते. सोमवारी (१९ एप्रिल) अभिनेत्रीने तिचा ३१ वा वाढदिवस साजरा केला. कोरोना कालावधी दरम्यान, तिने तिचा वाढदिवस साजरा केला आणि तिच्या वाढदिवसाशी संबंधित पोस्टही इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली.

शेअर केलेल्या या पोस्टमध्ये ईशा शिवानी राजशेखर आणि शिवाथमिका राजशेखर या तिच्या दोन अभिनेत्री मैत्रिणींसोबत दिसली आहे. तिने हा फोटो शेअर करत लिहिले, “मी तुमच्या दोघींवरही खूप प्रेम करते, माझ्या डार्लिंग. सरप्राईझ देण्यासाठी खूप धन्यवाद.”

अभिनेत्रीचा जन्म १९ एप्रिल, १९९० साली वारंगल येथे झाला आणि त्यानंतर तिचे संपूर्ण कुटुंब हैदराबादला राहायला गेले. ईशाकडे एमबीएची पदवी आहे आणि कॉलेजच्या काळापासूनच तिला मॉडेलिंगची फार आवड होती.

ईशा रेब्बाने तिच्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात २०१२ मध्ये रिलीझ झालेल्या ‘लाइफ इज ब्युटीफुल’ या तेलुगु चित्रपटातून केली होती. हा चित्रपट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर आधारित होता. २०१३ मध्ये रिलीझ झालेल्या ‘अंथका मुंडू आ तारवाथा’ या चित्रपटात तिला सुमंत अश्विनसमवेत मुख्य अभिनेत्रीची भूमिका मिळाली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बरेच यश मिळवले होते.

सन २०१६ मध्ये ईशाने ‘ओये’ या तमिळ चित्रपटाद्वारे तमिळ इंडस्ट्रीतही पदार्पण केले. या चित्रपटात ती गीतन ब्रिटोसोबत मुख्य भूमिकेत होती. सन २०१८ मध्ये ईशा तेलुगु सिनेमाचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआरच्या ‘अरविंद समीठा वीर राघव’ या चित्रपटात देखील दिसली होती.

यावर्षी रिलीझ होणार असलेल्या ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ या चित्रपटात अखिल अक्किनेनी आणि पूजा हेगडे यांच्यासोबत ईशा देखील दिसणार आहे. ईशा सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत असतात. इंस्टाग्रामवर तिला तब्बल १८ लाखांहून अधिक युजर फॉलो करतात. चाहते तिच्या चित्रपटांसोबतच, तिच्या लूकचेही वेडे आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-खूपच वाईट झालं यार! फेशियल ट्रीटमेंटने केला अभिनेत्रीचा चेहरा बर्बाद, दिसायची ‘इतकी’ सुंदर

-स्वत:ला अविवाहित असल्याचे सांगणाऱ्या अभिनेत्रीने केला बोल्ड फोटो शेअर, म्हणाली ‘…मी व्हर्जिन आहे?’

-भारीच! चौदा वर्षांपुर्वी अभिषेकबरोबर झालेल्या लग्नात ऐश्वर्या रायने घातली होती एवढ्या लाखांची साडी

हे देखील वाचा