Tuesday, July 9, 2024

एका वर्षात ३५ सिनेमे अन् ३६९ आलिशान गाड्यांचे कलेक्शन असणारे सुपरस्टार मामुट्टी, जाणून घ्या त्यांचा प्रवास

सिनेसृष्टीमध्ये काम करणारे कलाकार आपल्या दमदार अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकतात. अशात ते दमदार अभिनयासह दमदार मानधनासाठी देखील चर्चेत असते. सर्व कलाकार खूप आलिशान , आरामदायक आणि सर्व सुख सोईंनी संपन्न असे आयुष्य जगत असतात. अशात या कलाकारांना पाहूनच अनेक चाहते आपले जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये बदल करत असतात. अंबानी, टाटा यांच्यासारखी श्रीमंती असलेले कलाकार देखील सिनेसृष्टीमध्ये आहेत. साऊथ सिनेसृष्टीतील कलाकार तर मोठमोठ्या उद्योगपतींना आणि बॉलिवूडमधील कलाकरांना कमाईच्या बाबतीत जबरदस्त टक्कर देतात. याच दाक्षिणात्य चित्रपटांमधील एक मल्याळम चित्रपटांतील सुपरस्टार अभिनेता म्हणजे मामूट्टी. मामूट्टी यांच्या कमाईबद्दल आणि त्यांच्या श्रीमंतीबद्दल अनेकदा चर्चा रंगताना दिसतात. आज (७ सप्टेंबर) ते त्यांचा वाढदिवस साजरा करतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त घेऊया त्यांच्या श्रीमंतीचा आढावा.

मामूट्टी यांचे पूर्ण नाव मुहम्मद कुट्टी पनिपरमबिल इस्माइल असे आहे. त्यांचा जन्म कोट्टायम जिल्ह्यात ७ सप्टेंबर १९४८ रोजी झाला. मामूट्टी एका शेतकरी कुटुंबातील होते. त्यांनी महाराजा कॉलेजमधून शिक्षण घेतले. तसेच एर्नाकुलम सरकारी विधी महाविद्यालय येथून वकिलीची पदवी मिळवली. त्यांना लहानपणापासून वकील व्हायचे होते. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. त्यांचा अभिनयाकडे कल वाढू लागला होता. पुढे त्यांनी अभिनयतच त्यांचे करियर करायचे ठरवले. साल १९८०मध्ये त्यांनी सुल्फथ यांच्याशी विवाह केला. त्यांना दोन मुलं आहेत.

 

मामूट्टी यांचा चित्रपटातील अभिनय आणि अनुभव दांडगा आहे. त्यांनी आपल्या आता पर्यंतच्या कारकिर्दीत तब्बल ३८० चित्रपटांमध्ये काम केले आहे. एका वर्षात त्यांच्याकडे ३५ चित्रपटांमध्ये काम करण्याचा रेकॉर्ड आहे. साल १९९८ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ या सर्वात मोठ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मल्याळम चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांनी चाहत्यांना वेड लावले आहे.

मामूट्टी यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये डबल रोल साकारले आहेत. एकूण नऊ चित्रपटांमध्ये त्यांनी अशा भूमिका पार पडल्या. ते अभिनय क्षेत्रातील एकमेव असे अभिनेते आहेत ज्यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. त्यांच्या प्रतिभावान नि जिवंत अभिनयामुळेच त्यांनी आता पर्यंत एवढे मोठे यशाचे शिखर गाठले आहे.

मामूट्टी यांची आर्थिक संपत्ती देखील प्रचंड आहे. ते अतिशय लक्झरी जीवन जगतात. त्यांना वेगवेगळ्या गाड्यांची खूप आवड आहे. त्याच्याकडे ३० -४० नाही तर तब्बल ३६९ गाड्यांचे कलेक्शन आहे. त्यांनी आपल्या या गाड्यांसाठी एक स्वतंत्र गॅरेज देखील बनवून घेतले आहे. तसेच ते कोणताही वाहनचालक न ठेवता स्वतःच गाडी चालवणे पसंत करतात. त्यांच्या गाड्यांच्या यादीमध्ये टोयोटा लँड क्रूजर LC 200, फरारी, मर्सडीज आणि ऑडी चे वेगवेगळे मॉडेल, पोर्श, टोयोटा फॉर्च्यूनर, Mini Cooper S, F10 BMW 530d आणि 525d, BMW M3 इत्यादी गाड्या आहेत.

त्यांनी आता पर्यंत मल्याळमच नाही, तर हिंदी, तामिळ तसेच इंग्रजी या भाषिक चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे. त्यांना त्यांच्या उत्तम अभिनयासाठी १३ फिल्मफेयर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहेत. तसेच ते एक उत्तम निर्माते देखील आहेत. साल २००० मध्ये प्रदर्शित झालेली मालिका ‘ज्वालयय’चे मामूट्टी निर्माते होते. ही मालिका तब्बल २ वर्षे चांगलीच चालली. एका माहितीनुसार त्याच्याकडे तब्बल २१० कोटींची मालमत्ता आहे. त्यांचे स्वतःचे राहते घरचं ४ कोटींचे आहे. ते अनेक ब्रॅंड्सचे एम्बेसडर देखील आहेत त्यामधून देखील त्यांची चांगलीच कमाई होते.

‘फेयरनेस साबुन’ या साबणाची त्यांनी एकदा जाहिरात केली होती. यामुळे त्यांना कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागल्या. एका ग्राहकाने त्यांच्या विरोधात खटला दाखल केला होता. “मी एक वर्ष झालं हा साबण वापरतोय पण अजून गोरा नाही झालो” असं त्या ग्राहकच म्हणणं होतं. या दरम्यान देखील ते चांगलेच चर्चेत होते. तसेच तेव्हा त्यांना टीकेचा देखील सामना करावा लागला होता.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अक्षय कुमारसोबत केले होते पदार्पण; मात्र सुंदरतेने वेड लावलेली शांतीप्रिया आज का राहतेय बॉलिवूडपासून दूर?

-सिद्धार्थ शुक्लाच्या कुटूंबाकडून जारी करण्यात आले निवेदन; मुंबई पोलिसांचे आभार मानत, लोकांना केली ‘ही’ विनंती

-हर्षवर्धन राणेनंतर ‘या’ प्रसिद्ध खेळाडूसोबत नात्यात आहे किम शर्मा; स्वत: केला खुलासा

हे देखील वाचा